Moderna (Photo Credits: Twitter/ AFP)

जगभरात सर्वाधिक कोरोना वायरसचं थैमान असलेल्या अमेरिकेमध्ये आता फायझर पाठोपाठ मॉर्डना (Moderna) कंपनीच्या कोविड 19 लसीला (Covid-19 Vaccine) तातडीच्या वापरासाठी अमेरिकन एफडीए (US FDA) कडून मंजुरी मिळाली आहे. अशी माहिती Reuters वृत्तसंस्थेने दिली आहे.  मॉर्डना ही एमआरएन वॅक्सिन पद्धती आणणारी जगातील पहिली कंपनी होती. त्यामुळे या कंपनीच्या कोविड 19 वॅक्सिनकडे अमेरिकेप्रमाणेच जगाचं लक्ष लागलं होतं. प्रामुख्याने ग्रामीण भागात असणार्‍या हॉस्पिटल्समध्ये मॉडर्ना व्हॅक्सिन पोहचवल्या जाणार आहेत.

मॉर्डना कंपनीच्या तिसर्‍या टप्प्यातील मानवी चाचणीमध्ये 30 हजार लोकांना ही लस देण्यात आली होती. त्याच्या अहवालानुसार ही 95% प्रभावी आहे. या लसीमुळे कोविड ला रोखण्यास मदत होईल. लस प्रभावी असण्यासोबतच ती सुरक्षित देखील असल्याचा कंपनीचा दावा आहे. Emergency Use Authorisation म्हणजे काय? Moderna, Pfizer ते SII यांना त्यांची COVID-19 Vaccines बाजारात आणण्यासाठी नेमकी कशाची प्रतिक्षा.

फायझरच्या तुलनेत मॉर्डना लस देताना अल्ट्रा कोल्ड टेम्परेचरची गरज नाही. केवळ त्याच शिपिंग आणि साठवणूक करताना फ्रोझन केली जाणार आहे. मात्र प्रत्यक्ष लस देताना ती सामान्य रेफरिजरेटर ठेवली जाऊ शकते. दरम्यान अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी देखील ट्वीट करत 'मॉडर्ना आता उपलब्ध आहे' असं म्हटलं आहे. या लसीच्या कामासाठी अमेरिकन सरकारने मोठी आर्थिक मदत दिली होती. US COVID-19 Vaccine: कोरोना व्हायरसच्या संकटादरम्यान अमेरिकेत दिला गेला लसीचा पहिला डोस, डोनाल्ड्र ट्रंम्प यांनी ट्विट करत दिली माहिती.

Donald Trump Tweet

मॉर्डर्ना कंपनी सध्या या वर्षाअखेरीपर्यंत 20 मिलियन डोसेस सरकारला देण्याच्या तयारीमध्ये आहे. तर 2021 च्या पहिल्या तिमाहीमध्ये 100-125 मिलियन डोसेस देणार आहेत. ही लस देखील 2 शॉर्टमध्ये दिली जाणार आहे. लसीच्या पहिल्या डोसनंतर 28 दिवसांनी त्याचा दुसरा डोस दिला जाईल.