Mehul Choksi (Photo Credits- Twitter)

Mehul Choksi PNB Scam: डोमिनिका उच्च न्यायालयाने पुन्हा एकदा पीएनबी घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोकसी याच्या प्रत्यार्पणासाठी नकार दिला आहे. मेहुल चोकसी याने पंजाब नॅशनल बँकेत 13,500 कोटी रुपयांचा घोटाळा करुन परदेशात पळ काढला. न्यायमूर्ती एमई बिर्नी स्टीफेंसन यांनी आपल्या आदेशात असे म्हटले की, चोकसी सध्या डोमिनिका येथेच ठेवण्यात येणार आहे. कोर्टाने म्हटले, चोकसी संबंधित या प्रकरणाची पुढील सुनावणी येत्या 2 जूनला पार पडणार आहे. चोकसी याच्या वकिलांनी प्रत्यार्पणासाठी बंदी घालण्याच्या याचिकेवर सुनावणीदरम्यान कोर्टाने हा निर्णय घेतला आहे.

डोमिनिका कोर्टाने पुढे असे म्हटले की, चोकसी याची वैद्यकिय चाचणी आणि कोविड19 च्या चाचणीसाठी प्रशासनाने काहीही करुन त्याला डोमिनिका चाइना फ्रेंडशिप रुग्णालयात घेऊन जावे. तर चोकसी याने रविवारी एंटीगा आणि बारबुडा येथून पळ काढला. त्यानंतर मोठ्या प्रमाणात शोध घेतल्यानंतर त्याला बुधवारी डोमिनिका येथे अटक करण्यात आली होती.(Mehul Choksi PNB Scam: पीएनबी घोटाळा प्रकरणातील आरोपी मेहुल चोकसी याला भारतात खरोखरच आणता येईल?)

याच्या एक दिवस आधी भारतातील चोकसी याचे वकिल, विजय अग्रवाल यांनी IANS यांना असे म्हटले की, डोमिनिकाच्या एका कोर्टाने मेहुल चोकसी याच्या प्रत्यापर्णासाठी बंदी घातली आहे. गुरुवारी रात्री अग्रवाल यांनी म्हटले की, चोकसी याला एंटीगुआ येथून जबरदस्तीने जहाजात बसण्यात आले आणि त्याला डोमिनिका येथे आणले गेले. त्यांनी हा सुद्धा दावा केला की, चोकसी याच्या अंगावर बळाचा वापर केल्याचे ही निशाण आहेत. परंतु एंटीगा पोलीस आयुक्तांनी एटली रॉडन यांनी चोकसी याच्या वकीलाचे दावे फेटाळून लावले आहेत. चोकसी याला जबरदस्ती घेऊन जाण्याबद्दल कोणतीच माहिती नाही आहे.

दरम्यान, पीएनबी मध्ये घोटाळा केल्याप्रकरणी आरोपी चोकसी याने आपला पुतण्या नीरव मोदी याच्या सोबत मिळून 4 जानेवारी 2018 मध्ये एंटीगुआ आणि बारबुडा येथे राहत होता. या प्रकरणी विविध चार्जशीट दाखल करणाऱ्या सीबीआय आणि ईडी कडून चोकसी याच्या प्रत्यार्पणासाठी प्रयत्न करत आहेत.