Singapore Airlines विमानामध्ये बॉम्ब असल्याचा खोटा दावा करून केबिन क्रु सोबत गैरवर्तन करणारा पुरूष प्रवासी अटकेत; विमानाला फायटर जेटच्या मदतीने एस्कॉर्ट
Singapore Airlines (Photo Credits: ANI)

Singapore Airlines च्या विमानामध्ये एका प्रवाशाने बॉम्ब असल्याचं सांगून खळबळ उडवून दिली. आजच्या या घटनेमध्ये विमानाचं फायटर जेट्स च्या मदतीने Changi आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षित उतरवण्यात आले. दरम्यान याबाबतची माहिती सिंगापूरच्या संरक्षण मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. Republic of Singapore Air Force F-16C/D fighter jets च्या मदतीने त्याला एस्कॉर्ट करण्यात आले. यावेळी पोलिसही तैनात होते.

37 वर्षीय पुरूषाने अमेरिकेच्या सॅन फ्रान्सिको मधून प्रवास सुरू केल्यानंतर त्याच्या हॅन्ड बॅगेमध्ये बॉम्ब असल्याचा दावा केल्याची माहिती मंत्रालयाने दिली आहे. तपासानंतर हा दावा खोटा असल्याचं समोर आलं. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे. दरम्यान या विमानामध्ये बॉम्ब असल्याचा दावा करणार्‍या व्यक्तीने केबिन क्रु सोबतही गैरवर्तन केले आहे.

सिंगापूर पोलिसांकडून या प्रकरणी अधिक माहिती देण्यात नकार दिला आहे. दरम्यान सिंगापूर एअरलाईन्सच्या प्रवक्त्यांनी सारे इतर प्रवासी आणि क्रू मेंबर्स सकाळी 9.20 (0130 GMT)वाजता सुरक्षित लॅन्ड झाल्याचे म्हणाले आहेत. या प्रकरणी इतर काही माहिती देण्यास त्यांनी नकार दिला आहे.  SQ33 विमानामध्ये 209 प्रवासी प्रवास करत होते. सारे सुरक्षित आहेत.