कुत्रा म्हणून घरी आणले, निघाला उंदीर
फोटो सौजन्य - गुगल

काही लोकांना आपल्या घरात पाळीव प्राणी पाळण्याची खूप हौस असते.तसेच या प्राण्यांबरोबर खेळताना वेळेचे कधी कधी भानही राहत नाही. त्यामुळेच चीनमध्ये एका व्यक्तीने घरी पाळण्यासाठी कुत्रा हवा होता. मात्र व्यक्तीने घरी कुत्रा समजून उंदीर आणल्याचे त्याला काही दिवसांनंतर कळले. या घटनेने त्या व्यक्तीची झोपच उडाली आहे.

सप्टेंबर महिन्यात चीनमध्ये राहणाऱ्या एक व्यक्ती  मित्राकडे काही कामासाठी गेला होता. त्यावेळी हे दोघे घराबाहेर बसले असता त्यांना रस्त्यावर सोडलेल्या कुत्र्याचे पिल्लू दिसले. तर या दोघांनी कुत्र्याचे पिल्लू समजून त्याला घरी आणले. मात्र काही दिवसांनंतर आणलेल्या कुत्र्याचे बारकाईने निरिक्षण केले असता त्याला कुत्र्यासारखे केस ही नाही आणि कुत्र्यासारखा धावत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे नक्की हा कुत्रा आहे की उंदीर हे खरं करण्यासाठी त्यांनी सोशल मिडियावर त्याचे फोटो व्हायरल केले.

सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या या पोस्टमुळे लोकांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. काही दिवसांतच या दोघांना त्यांनी पोस्ट केलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले. तर पोस्ट केलेल्या फोटोमधील हा बांबू या विशिष्ट पद्धतीचा उंदीर असल्याचे त्यांना कळले. तसेच हा उंदीर खासकरुन साऊथ चायनामध्ये सापडत असल्याचे ही त्यांना प्रतिक्रियेमध्ये सांगितले गेले.