मांजर (Photo Credits Pixabay)

दक्षिण कोरियामध्ये पाळीव प्राण्यांमध्ये कोविड-19 (COVID-19) संसर्ग झाल्याचे प्रथम प्रकरण समोर आलं आहे. येथे एक मांजरीचं पिल्लू (Cat Kittens) कोरोना पॉझिटिव्ह आढळलं आहे. गुरुवारी मांजरीच्या संक्रमित पिल्लाची तपासणी करण्यात आली, जी सकारात्मक असल्याचे दिसून आले. सरकारी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मांजरीचे पिल्लू दक्षिण गेयॉन्गसांग प्रांतातील दक्षिण-पूर्व शहर जिन्जू येथील धार्मिक ठिकाणी आढळले. न्यूज एजन्सी योनहॅप यांनी रविवारी पंतप्रधान चुंग सिय-क्यूएन हवाला देत म्हटलं आहे की, नुकत्याच झालेल्या ट्रॅकिंग प्रक्रियेदरम्यान आरोग्य अधिकाऱ्यांनी पाळीव प्राणी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं पहिलं प्रकरण पाहिलं.

या महिन्याच्या सुरुवातीस, तेथे गेलेल्या 29 लोकांना संसर्ग झाल्याची पुष्टी झाली. या लोकांसह 100 हून अधिक लोक सकारात्मक आढळले. एका ट्रॅकिंग प्रक्रियेदरम्यान अधिकाऱ्यांना आढळले की, तीन पाळीव मांजरी धार्मिक साइटजवळ राहतात. यापैकी मांजरीच्या पिल्लाला कोरोनाची लागण झाल्याचे आढळले. तिच्या आई आणि बहिणीच्या संपर्कातून या छोट्या मांजरीच्या शरीरात व्हायरस आल्याचा संशय आरोग्य अधिकाऱ्यांना आहे. आरोग्य तज्ज्ञांचा हवाला देत एका सरकारी अधिकाऱ्याने सांगितले की, पाळीव प्राण्यांना मनुष्याकडून हा विषाणू मिळणे अत्यंत दुर्मिळ आहे. (वाचा - Covid-19 Vaccine पुरवल्याबद्दल हनुमानाचा फोटो ट्विट करत ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष Jair Bolsonaro यांनी मानले भारताचे आभार; पंतप्रधान मोदींनी दिले 'हे' उत्तर)

पाळीव प्राण्यांमध्ये राहणाऱ्या लोकांवर बारीक नजर ठेवण्यासाठी आणि प्राण्यांच्या संपर्कात राहून मानवांना संसर्ग होतो की, नाही हे शोधण्यासाठी पारदर्शक पद्धतीने तपासणी करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी आरोग्य अधिकाऱ्यांना केलं. जपान, हाँगकाँग आणि ब्राझील यासारख्या ठिकाणी पाळीव प्राण्यांना आपल्या मालकांकडून विषाणूचा संसर्ग झाल्याच्या घटना घडल्या आहेत. परंतु दक्षिण कोरियामध्ये अशा कोणत्याही घटनेची पुष्टी झालेली नाही.