लंडन येथील रोबोटिक्स कंपनी जिओमिक सध्या रोबोसाठी माणसासारखा दिसणारा चेहरा हवा आहे. ज्यासाठी कंपनीने संबधित व्यक्तीला तब्बल 92 लाख रुपये देण्याचे ठरवले आहे. रोबोटिक्स कंपनी गेल्या अनेक वर्षांपासून या प्रोजेक्ट काम करत करत आहे. त्यावेळी कंपनीने अत्यंत गोपनीय अशी कल्पना तयार केली होती. तसेच यासंदर्भात कोणतीही माहिती कंपनी बाहेर जाणार नाही, याची काळजीही घेतली होती. सध्या कंपनी रोबोसाठी मानली आवभाव असणाऱ्या चेहऱ्याचा शोध घेत आहे. कंपनीकडून निवडलेल्या जाणाऱ्या मानवी चेहऱ्या ही रक्कम दिली जाणार असून संबधित व्यक्तीकडून करार केला जाणार आहे. याआधी रोबोटिक्स कंपनीने अनेक प्रकल्पावर काम केले असून येत्या पुढील वर्षापर्यंत हा रोबो तयार होईल, अशी माहिती समोर आली आहे.
टेक कंपनी जिओमिक यांनी लोकांसमोर नवी अपेक्षा ठेवून अनेकांचे लक्ष केंद्रित करुन घेतले आहे. कंपनीला रोबोसाठी माणसासारखा दिसणार चेहरा हवा आहे. यासाठी कंपनीकडून काही अटी ठेवण्यात आल्या आहेत. ज्या चेहऱ्यामध्ये दयाळूपणा आणि मैत्रीपूर्ण भाव असतील, अशाच चेहऱ्याच्या शोधात कंपनी आहे. त्यासाठी कंपनीकडून संबधित व्यक्तीला तब्बल 92 लाख रुपये देण्यात येणार आहे. कंपनी रोबोला हुबेहुब माणसासारखा चेहरा देण्यासाठी प्रयत्न करत आहे. महत्वाचे म्हणजे कंपनी अशाप्रकारच्या चेहऱ्याचा शोध सुरु केला आहे. त्याचबरोबर निवड करण्यात आलेल्या चेहऱ्याला मोबदला म्हणून ही रक्कम ठरविण्यात आली आहे. हे देखील वाचा- Chandrayaan-1 ची 11 वी वर्षपूर्ती, जाणून घ्या काही खास गोष्टी
याआधी जगाभरात अनेक प्रकारचे रोबोट तयार केले आहेत. एवढेच नव्हे तर, सौदी अरेबियातील सोफिया रोबोटला त्यांच्या देशाचे नागरित्व देखील देण्यात आले आहे. परंतु मानवी आवभाव असणारा हा अनोखा रोबोट ठरणार अशी शक्यता वर्तवली जात आहे.