London Bridge Attack: लंडन ब्रिज दहशतवादी हल्ल्याचे कनेक्शन पाकिस्तानशी; Terrorist उस्मान शेखला अटक
उस्मान खान (संग्रहित संपादित प्रतिमा)

ब्रिटनमधील ऐतिहासिक लंडन पुलावर (London Bridge) झालेल्या दहशतवादी हल्ल्यात (Terror Attack) आतापर्यंत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी झालेल्या या हल्ल्यात आता पाकिस्तानचे कनेक्शन समोर येत आहे. पाकिस्तानी वंशाच्या 28 वर्षीय उस्मान खानने (Usman Khan) हा हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे. ब्रिटीश माध्यमांच्या म्हणण्यानुसार, याधीही उस्मानचे नाव दहशतवादी घटनांमध्ये अनेकदा समोर आले आहे. ठार झालेल्या दोन लोकांमध्ये एक महिला आणि एक पुरुष यांचा समावेश आहे. उस्मान हा पाकिस्तानचा रहिवासी असून, आता स्कॉटलंड यार्डने उस्मान खानचे नाव सार्वजनिक केले आहे.

2012 मध्ये लंडन स्टॉक एक्सचेंजला बॉम्ब स्फोटाद्वारे उडवण्याच्या कटाच्या अंतर्गत उस्मानला अटक करण्यात आली होती. स्कॉटलंड यार्डला उस्मानकडून एक टारगेट यादी मिळाली आहे. या यादीमध्ये ख्रिसमसच्या काळात पंतप्रधान बोरिस जॉनसन यांच्या घराबरोबरच, अमेरिकन दूतावास आणि लंडन स्टॉक एक्सचेंजवर हल्ला करण्याची तयारी करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. उस्मानने पाकिस्तानच्या ताब्यात असणाऱ्या काश्मीरमधील आपली जमीन दहशतवादी प्रशिक्षण शिबिराची स्थापना करण्यासाठी दिली आहे. अल कायदाच्या विचारधारेचा त्याच्यावर फार मोठा प्रभाव आहे. (हेही वाचा: London Bridge Attack: प्रसिद्ध 'लंडन ब्रिज'वर दहशतवादी हल्ला; गोळीबार आणि चाकूहल्ल्यात अनेकजण जखमी)

2012 मध्ये लंडन येथे झालेल्या आतंकवादी हल्ल्यानंतर, उस्मानला एप्रिल 2013 मध्ये कोर्टाने 16 वर्षांची शिक्षा सुनावली होती. पण नंतर ती कमी करून आठ वर्षे करण्यात आली. शुक्रवारी पॅरोलवर बाहेर आलेल्या उस्मानने हे कृत्य केले असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. दरम्यान, काल पोलिसांना दुपारी 1.50 (लंडन वेळेनुसार) वाजता, या लंडन ब्रिज परिसरात चाकूहल्ला झाला असल्याचा फोन आला. त्यानंतर पोलिसांनी ताबडतोब घटनास्थळी पोहचून चौकशी सुरु करत एका व्यक्तीला अटक केली. काही लोकांनी या परिसरात गोळीबार झाल्याचाही आवाज ऐकला आहे.