Shots Fired At Hindu Businessman's House: कॅनडातील सरे येथे खलिस्तानी कट्टरपंथीयांकडून लक्ष्मी नारायण मंदिराचे अध्यक्ष सतीश कुमार यांच्या घरावर गोळीबार
Firing | Representational image (Photo Credits: pixabay)

Shots Fired At Hindu Businessman's House: कॅनडाच्या ब्रिटीश कोलंबिया प्रांतातील सरे (Surrey) येथे एका प्रमुख हिंदू व्यावसायिकाच्या घरावर 14 राऊंड गोळ्या झाडण्यात आल्या. ही घटना 27 डिसेंबर रोजी सकाळी 8:03 वाजता 80 Avenue च्या 14900 ब्लॉकमध्ये घडली. सरे रॉयल कॅनेडियन माउंटेड पोलिस (RCMP) च्या निवेदनानुसार, लक्ष्य केलेले निवासस्थान सरे येथील लक्ष्मी नारायण मंदिराचे (Lakshmi Narayan Temple) अध्यक्ष सतीश कुमार (Satish Kumar) यांच्या मोठ्या मुलाचे आहे. सतीश कुमार यांनी इंडिया टुडेला सांगितले की, त्यांच्या मुलाच्या घरावर हल्ला करण्यात आला. घरावर किमान 14 राऊंड गोळीबार करण्यात आला.

कुमार यांनी सांगितले की, 'हा हल्ला खलिस्तानींनी केला की खंडणीखोरांनी, हे मी सांगू शकत नाही. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.' यापूर्वी तीनदा कथित खलिस्तानी कार्यकर्त्यांनी मंदिरालाही लक्ष्य केले होते. गोळीबारात कोणीही जखमी झाले नाही, परंतु गोळ्यांच्या छिद्रांमुळे घराचे नुकसान झाले. पोलिसांनी घटनास्थळी तपास सुरू केला असून पुरावे तपासले आहेत. (हेही वाचा -Genocide in Nigeria: आफ्रिकन देश नायजेरियामध्ये मोठा नरसंहार; किमान 160 ठार आणि 300 जखमी- Reports)

सरे आरसीएमपी जनरल इन्व्हेस्टिगेशन युनिटने तपास हाती घेतला आहे आणि अधिकारी हल्ल्यामागील हेतू निश्चित करण्यासाठी काम करत आहेत. खलिस्तानी गटांच्या वाढत्या उपद्रवी घटनांच्या अनुषंगाने, कॅनडातील हिंदू समुदायांची तोडफोड आणि मंदिरांना लक्ष्य करून हल्ले करण्यात वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडली आहे. (हेही वाचा - Hindu Mandir Vandalised In US: अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये हिंदू मंदिराची तोडफोड, भिंतींवर लिहिलेल्या खलिस्तान समर्थक घोषणा)

तथापी, काही दिवसांपूर्वी खलिस्तान्यांनी सरे येथील लक्ष्मी नारायण मंदिराची तोडफोड आणि ब्रॅम्प्टन आणि ग्रेटर टोरंटो परिसरातील मंदिरांमध्ये भारतविरोधी भित्तिचित्रांची फवारणी केली होती. कॅनडाच्या सरकारने या हल्ल्यांचा निषेध केला असून प्रभावित समुदायांना मदत करण्याचे वचन दिले आहे. हिंदू मंदिरांची विटंबना होत असल्याचा मुद्दा भारताने कॅनडासमोर अनेकदा मांडला आहे.