Kidnapped Judge in Pakistan: पाकिस्तानमध्ये अपहरण झालेल्या न्यायाधीशाची सुखरूप सुटका; घटनास्थळावरून वाहन जप्त
Pakistan flag (PC - Wikimedia Commons)

Kidnapped Judge in Pakistan: पाकिस्तानमध्ये दोन दिवसांपूर्वी अपहरण (Kidnapped) करण्यात आलेल्या न्यायाधीश (Judge)ची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. खैबर पख्तूनख्वा (Khyber Pakhtunkhwa) प्रांतात न्यायाधीशाचे सशस्त्र अपहरण करण्यात आले होते. जिल्हा आणि सत्र न्यायाधीशाची कैदेतून सुटका करण्यात आल्याचे खैबर पख्तूनख्वा (केपीके) सरकारचे प्रवक्ते सैफ यांनी आज सोमवारी सांगितले. (हेही वाचा :Harvard University protester: पॅलेस्टाईन समर्थकांनी हार्वर्ड विद्यापीठात अमेरिकन ध्वजाच्या जागी पॅलेस्टिनी ध्वज उभारला, आत्तापर्यंत 900 जणांना अटक )

27 एप्रिल रोजी अफगाणिस्तानच्या सीमे लगत असलेल्या टाकी आणि डेरा इस्माईल (डीआय) खान इथून न्यायाधीशाचे अपहरण करण्यात आले होते. या संपूर्ण प्रकरणात न्यायाधीशांसह त्यांच्या चालकाला कोणतीही इजा झाली नाही. घटनास्थळावरून वाहनही जप्त करण्यात आले आहे. सध्या पोलिस घटनेचा कसून तपास करत आहेत.

सत्र न्यायाधीशांची कैदेतून बिनशर्त सुटका करण्यात आली आहे. ते सुरक्षितरित्या त्यांच्या निवासस्थानी पोहोचले आहे. केपीके पोलिसांच्या दहशतवाद विरोधी विभागाचे प्रवक्ते सैफ यांनी सांगितले की, सुरक्षा दलांसह केपीके सरकार दहशतवादा विरोधात लढत आहे. न्यायाधीशाच्या अपहरणाची जबाबदारी अदयाप कोणीही घेतली नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.