Hezbollah pager blasts: लेबनॉनमधील हिजबुल्लाह सदस्यांवर पेजर आणि वॉकी टॉकी स्फोटचा झाला. या स्फोटात सुरुवातीला जवळपास २० लोक ठार झाले. तर हजारो हिजबुल्लाह सदस्य जखमी झाले. या स्फोटामुळे जग हादरले आहे. स्फोटात वापरलेल हे पेजर कोणत्या कंपनीच्या माध्यमातून हिजबुल्लाह पर्यंत पोहोचले याची जगभरात चर्चा केली जात आहे. या सगळ्या स्फोटाचे धक्कादायक बाब समोर आली आहे. ते म्हणजे या स्फोटाचा केरळ मध्ये जन्मलेल्या व्यक्तीचा कनेक्शन आहे. (हेही वाचा- लेबनॉनमधील बेरूतमध्ये वॉकी टॉकीचा स्फोट; हिजबुल्लाह सदस्यांवर सलग दुसऱ्या दिवशी हल्ला)
मिळालेल्या माहितीनुसार, हिजबुल्लाहने या स्फोटांसाठी इस्रायलला जबाबदार धरले आहे. इस्रायलने अद्याप याची थेट जबाबदारी घेतलेली नाही. त्यानंतर या हल्ल्यात केरळमध्ये जन्मलेल्या एका व्यक्तीचे नाव देखील समोर आले आहे, जो आता नॉर्वेचा नागरिक आहे. हंगेरियन मीडिया आउटलेटने अहवाल दिला की, बल्गेरियन कंपनी, नॉर्टा ग्लोबल लिमिटेड पेजरच्या करारामागे होती. नॉर्टा ग्लोबलची स्थापना रिन्सन जोस या नॉर्वेजियन नागरिकाने केली होती.
रिन्सन जोस कोण?
रिन्सन जोस यांचा जन्म केरळ येथील वायनाड येथे झाला. त्याने एमबीए पूर्ण केल्यानंतर तो नॉर्वेला गेला. रेन्सन जोस हे बल्गेरियन शेल कंपनी नॉर्टा ग्लोबल लिमिटेडचे मालक आहेत. रिन्सनचा चुलत भाऊ अजू जॉन याने मनोरमा ऑनलाईनला सांगितले, '' त्याने मला त्याच्या बल्गेरियातील कोणत्याही कंपनीबद्दल किंवा तेथील व्यवसायाबद्दल सांगितले नाही. त्यामुळे आम्ही चिंता व्यक्त करत आहोत.