Walkie-Talkie Blasts in Lebanon: लेबनॉनमधून काही काळापूर्वी पुन्हा स्फोट झाल्याची बातमी आली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे यावेळी वॉकी-टॉकी फुटल्याचे सांगण्यात येत आहे. काल लेबनॉन आणि दमास्कसमध्ये 3000 पेजर्सचा स्फोट झाला आणि 3000 हून अधिक लोक जखमी झाले. आता हिजबुल्लाच्या बेरूत किल्ल्यामध्ये वॉकी टॉकीमध्ये स्फोट झाला आहे. यामध्ये 3 जणांचा मृत्यू आणि अनेक लोक जखमी झाले आहे. पेजर बॉम्बस्फोटात मारला गेलेला हिजबुल्लाह खासदार अली अम्मर याच्या मुलाच्या अंत्यसंस्काराच्या वेळी काही स्फोट झाल्याची माहिती मिळत आहे. हे स्फोट ही बाब दर्शवतात की, हे नवीन युगाचे हल्ले आहेत, ज्यामध्ये पूर्णपणे वेगळे तंत्रज्ञान वापरले जात आहे. पेजर स्फोट कसे झाले किंवा लेबनॉनमध्ये कसे घडले याबद्दल भिन्न गोष्टी बोलल्या जात आहेत. प्राथमिक माहितीनुसार, पेजर सिस्टीम हॅक करून हा स्फोट घडवण्यात आल्याचे सांगण्यात आले. याचा संशय इस्रायल आणि तिची गुप्तचर संस्था मोसादवर टाकला जात आहे. (हेही वाचा: Lebanon Pager Explosion: लेबननमध्ये पेजरमध्ये बॉम्बस्फोट, 8 जणांचा मृत्यू तर 2750 जखमी)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)