Hydrogen Balloon Explosion Video: हनोईमध्ये वाढदिवस साजरा करत असतांना एका महिलेच्या हातात हायड्रोजन बलूनचा स्फोट झाला. हि घटना  14 फेब्रुवारी रोजी घडल्याचे समोर आले आहे . जियांग फाम यांनी सोशल मीडियावर शेअर केलेली ही घटना रेस्टॉरंटमध्ये घडली. जियांगने हायड्रोजन  बलून विकत घेतले होते आणि स्टेजवर केकसोबत फोटो काढण्यात मग्न असतांना फुग्याचा स्फोट झाला. हायड्रोजन-भरलेले फुगे, जे सामान्यत: हवेपेक्षा हलके असतात म्हणून वापरले जातात, अत्यंत ज्वलनशील असू शकतात आणि घरगुती वापरासाठी असुरक्षित मानले जातात, कारण उष्णता किंवा ठिणगीच्या संपर्कात आल्यास त्यांचा स्फोट होण्याचा धोका असतो.

व्हिएतनाममध्ये वाढदिवसाच्या पार्टीदरम्यान एका महिलेच्या चेहऱ्यावर हायड्रोजन फुगा फुटला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)