Johnson And Johnson (Photo Credits-Twitter)

अमेरिकेतील फूड अॅन्ड ड्रग अॅडमिनेस्ट्रेशन यांना कॅन्सरकारक तत्व आढळून आल्याने जॉनसन अॅन्ड जॉनसन (Johnson and Johnson) यांनी बेबी पावडरचे विकण्यासाठी बाजारात पाठवलेले 33 हजार डबे पुन्हा मागवले आहेत. कंपनीने याबाबत शुक्रवारी माहिती दिली आहे. न्यूयॉर्क टाइम्स यांच्या नुसार, ऑनलाईन पद्धतीने विकण्यासाठी ठेवण्यात आलेल्या जॉनसनच्या पावडर मध्ये कॅन्सर तत्वावर आधारित असलेले क्रायइसोटाइल आढळले आहेत. या प्रकारानंतर कंपनीचे शेअर्स 6 टक्क्यांनी घरसले.

कंपनीच्या एका प्रवक्त्यांनी असे म्हटले आहे की, #22318RB लॉट पुन्हा मागवण्यात आला आहे. त्यामधील 33 हजार पावडरचे डबे एका अज्ञात रिटेलरने विकले आहेत. कंपनीसोबत असे पहिल्यांदाच घडले असून त्यांनी पावडरचे डबे बाजारातून पुन्हा मागवले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून कंपनीने हा निर्णय घेतला असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

जॉनस अॅन्ड जॉनसन कंपनीची बेबी पावडर, शॅम्पू णि साबणासह अन्य गोष्टी भारतासह अन्य जगभरात त्याची वेगळी ओळख आहे. मात्र सध्या कंपनीला त्यांच्या काही प्रोडक्ट्स मुळे खटला आणि दंडाची रक्कम भरावी लागत आहे. नुकत्याच एका व्यक्तीने कंपनीच्या प्रोडक्ट्स बद्दल प्रश्न उपस्थित करत कोर्टाचा दरवजा खटखटवला आहे. त्यामुळे कंपनीला 8 बिलियन डॉलर रुपयांचा दंड सुनावला आहे.(Dominos Pizza भारतात बंद होण्याच्या वाटेवर; स्वीडन सह या 4 देशांतील आऊटलेट्स झाले बंद)

भारतातही जॉनसन कंपनीच्या बेबी शॅम्प मध्ये कॅन्सरकारक तत्व आढळून आले होते. गेल्या एप्रिल महिन्यात राजस्थान ड्रग कंट्रोलच्या एका रिपोर्टमध्ये बेबी शॅम्पूमध्ये हे तत्व असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. त्यानंतर राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाने राज्यभरासह अन्य ठिकाणी एक नोटीस जाहीर करत कंपनीच्या प्रोडक्ट्सवर बंदी घालण्यात यावी असे म्हटले होते. तसेच मार्केटमधून कंपनीचे प्रोडक्ट्स हटवण्यात यावे अशी ही मागणी करण्यात आली होती.