Dominos Pizza भारतात बंद होण्याच्या वाटेवर; स्वीडन सह या 4 देशांतील आऊटलेट्स झाले बंद
Dominos Pizza (Photo Credits: Facebook)

डॉमिनोज पिझ्झा (Domino's Pizza) चाहत्यांसाठी अत्यंत वाईट आणि धक्कादायक बातमी! जागतिक मंदीची झळझळ ही डॉमिनोज पिझ्झा कंपनीला ही बसली लवकरच भारतातील Domino's Pizza चे आऊटलेट्स बंद होण्याच्या वाटेवर आहेत. 30 मिनिटांत पिझ्झा डिलिव्हरी करणारा हा डॉमिनोज पिझ्झा भारतासह (India) संपुर्ण जगभरात प्रसिद्ध आहे. मात्र हाच लोकप्रिय ब्रँड सध्या अडचणीत आला आहे. जागतिक मंदीचा फटका ब-याच देशांना बसला असून डॉमिनोज पिझ्झा ही या जाळ्यात अडकले आहे. या मंदीमुळे डॉमिनोज पिझ्झाला मोठ्या प्रमाणात तोटा होत असल्याचे समोर आले आहे.

ई सकाळ ने दिलेल्या वृत्तानुसार, ब्रिटनमधील ही कंपनी तोट्यात असल्याने कंपनीने हा निर्णय घेतला आहे. याबद्दलची माहिती डॉमिनोज चे मुख्य कार्यकारी अधिकारी डेविड वाइल्ड यांनी दिली आहे. सध्या कंपनीला मोठं आर्थिक नुकसान सहन करावं लागतय. त्यामुळे कदाचित भारतातील डॉमिनोज चे आऊटलेट्स बंद होण्याची शक्यता आहे.

हेदेखील वाचा- Dominos, KFC , MCDonalds मधून खाणे टाळल्यास डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया बळावणार; नरेंद्र मोदी यांच्या नावे व्हायरल होणाऱ्या या Whatsapp मेसेज मागील सत्य जाणून घ्या

सर्वांचा आवडता डॉमिनोज पिझ्झा बंद होणार असल्याने चाहत्यांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळतो. स्वीडन, स्वित्झर्लंड, आईसलँड, नॉर्वे या 4 देशांमध्ये डॉमिनोजचे आउटलेट्स बंद झाले आहेत. त्यामुळे भारतातही डॉमिनोजचे आऊटलेट्स बंद होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

कोणतीही पार्टी असली,गेट टुगेदर असले किंवा अगदीच जेवण करायचा कंटाळा आला की खवय्ये डॉमिनोज पिझ्झा ऑर्डर करतात. त्यात त्याची 30 मिनिटांत मिळणारी डिलव्हरी हा देखील डॉमिनोजचा प्लस पॉईंट असल्यामुळे ग्राहक नेहमी संतुष्ट असतात. मात्र आता फास्ट सर्विस देणारा डॉमिनोज पिझ्झा बंद होणार अशी चिन्हे दिसू लागल्यामुळे पिझ्झा प्रेमींची निराशा झाली आहे.