Johannesburg Fire: दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे इमारतीला लागलेल्या भीषण आगीत 63 जणांचा मृत्यू
Johannesburg Fire

दक्षिण आफ्रिकेतील सर्वात मोठे शहर जोहान्सबर्ग येथे एका बहुमजली इमारतीला लागलेल्या आगीत 63 जणांचा मृत्यू झाला असून 43 जण जखमी झाले आहेत. आपत्कालीन व्यवस्थापन सेवेने सांगितले की गुरुवारी पहाटे ही आग लागली, या आगीत आतापर्यंत किमान 63 लोकांचा मृत्यू झाला असून 43 जण जखमी झाले. प्रवक्ते रॉबर्ट मुलाउडझी यांनी सांगितले की, मदत आणि बचाव कार्य सुरूच असून मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो.  (हेही वाचा - Viral Video: घराच्या छतावर दिसला 16 फुट लांबीचा अजगर, अंगाला काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल)

पाहा व्हिडिओ -

अधिका-यांनी सांगितले की, आगीवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळवण्यात आले आहे, परंतु काळ्या पडलेल्या इमारतीच्या खिडक्यांमधून अजूनही धूर निघत आहे. दक्षिण आफ्रिकेचे सार्वजनिक प्रसारक एसएबीसीने सांगितले की, जोहान्सबर्ग येथे असलेली ही इमारत पाच मजली उंच आहे. सीएनएनने एसएबीसीच्या हवाल्याने सांगितले की, आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या व्हिडिओमध्ये एका इमारतीच्या तळमजल्यावर आगीच्या प्रचंड ज्वाला दिसत आहेत.

एका ट्विटरच्या व्हिडिओमध्ये मोठ्या संख्येने लोक बाहेर धावताना दिसत आहेत. आपत्कालीन सेवांचे प्रवक्ते रॉबर्ट मुलाउडझी म्हणाले की अनेक लोकांवर उपचार केले जात आहेत आणि काहींना आरोग्य सेवा सुविधांमध्ये नेण्यात आले आहे. SABC च्या मते, आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. आगीचे कारण भूकंप असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. लोकांच्या सुटकेसाठी बचाव कर्मचारी सातत्याने शोध मोहीम राबवत आहेत. मृतांमध्ये एका मुलाचाही समावेश आहे. सर्व जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, या इमारतीत किमान 200 लोक राहत होते.