जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेल्या, जेफ बेझोस (Jeff Bezos) यांनी आता 165 मिलियन डॉलरर्सपेक्षा (1171.5 कोटी) अधिक किंमतीत, बेव्हरली हिल्स (Beverly Hills) येथे आलिशान घर खरेदी करून विक्रम केला आहे. ब्लूमिंग बर्गच्या मते, अॅ्मेझॉन (Amazon) चे संस्थापक जेफ बेझोस यांनीने लॉस एंजेलिस परिसरात जणू काही एक मोठा वाडाच विकत घेतला आहे. या परिसरातील विक्रीचा हा एक नवीन मालमत्ता रेकॉर्ड आहे. हे घर एकूण 9 एकरात पसरले आहे. आपल्या गर्लफ्रेंडच्या सांगण्यावरून बेझोस यांनी ही मालमत्ता विकत घेतल्याचे सांगितले जात आहे.
अमेरिकन वृत्तपत्र 'वॉलस्ट्रिट जर्नल' च्या वृत्तानुसार, बेझोसने हे आलिशान घर (वॉर्नर इस्टेट) ला मीडिया व्यावसायिक डेव्हिड जेफनकडून विकत घेतले आहे. लॉस एंजेलिसमधील निवासी मालमत्तेसाठी हा आतापर्यंतचा सर्वात महागडा करार आहे. यापूर्वी 2019 मध्ये, बेल-एअर इस्टेट खरेदी करण्यासाठी लाशन मर्डोक यांनी सुमारे 150 मिलियन डॉलर्स रक्कम मोजली होती.
या घरात गेस्ट हाऊस, टेनिस कोर्ट आणि 9 गोल्फ कोर्ससह इतर अनेक गोष्टी आहेत. हे घर 1930 मध्ये वॉर्नर ब्रदर्सचे माजी अध्यक्ष जॅक वॉर्नर यांनी बनवले होते. या हवेलीच्या आत नऊ-होल गोल्फ कोर्स आहेत. अलीकडेच, बेझोसने आपल्या पत्नीसोबत घटस्फोटाबद्दल एक मोठा करार केला, ज्यामध्ये भरपाई म्हणून त्यांना पत्नीला एक मोठी रक्कम द्यावी लागली. (हेही वाचा: हा आहे जगातील सर्वात महागडा घटस्फोट; एका अफेअरमुळे तुटला 25 वर्षांचा संसार)
बेझोस आणि त्यांची गर्लफ्रेंड लॉरेन सान्चेझ एका वर्षापासून नवीन घराच्या शोधात होते. मात्र आता ते या घरात राहतील का नाही हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. बेझोस यांनी गेल्या वर्षी न्यूयॉर्कमध्ये 12 बेडरूमचे घर, 554 कोटी रुपयांमध्ये खरेदी केले.