Japanese Man Look Like A Wolf | Image used for representational purpose (Photo Credits: Pixabay)

माणसाच्या फॅन्टसीज (Human Fantasies) काय काय असतील सांगता येत नाही. जपानमधील ( Japanese Man) एका व्यक्तीला चक्क लांडग्यासारखं दिसावं वाटत होतं. आपली लांडग्यासारखं दिसण्याची हौस पुरविण्यासाठी या पठ्ठ्याने 3,000,000 येन म्हणजेच भारतीय चलनात सांगायचे तर चक्क 18.5 लाख रुपये खर्च केले आहेत. Zeppet नावाच्या कंपनीकडून त्याने एक पोषाख बनवला आहे. ज्यामुळे तो मागच्या पायावर चालणाऱ्या लांडग्यासारखा दिसू शकेल. (Japanese Man Look Like A Wolf Walking On Hind Legs)

Zeppet कंपनीच्या या ग्राहकाने नाव न सांगण्याच्या अटीवर प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, त्याने लांडग्यासारखे दिसावे म्हणून इतका खर्च केला कारण त्याला बालपणापासूनच प्राण्यांविषयी प्रचंड आकर्षण आणि प्रेम होते. एके दिवशी त्याने टीव्हीवर प्राण्यांसारखे दिसणारे काही पोषाख पाहिले. तेव्हापासूनच त्याने लांडगा होण्याचे म्हणजेच लांडग्यासारखे दिसू शकेल असा पोषाख बनविण्याचे स्वप्न पाहिले. त्याने लगेच संबंधित कंपनीला संपर्क केला. कंपनीने त्याचे मोजबाप घेतले आणि तसा पोषाख शिवला. त्या व्यक्तीने त्याच्या फिटिंग्ज आणि मोजमापांसाठी स्टुडिओला अनेक वेळा भेट दिली. (हेही वाचा, Viral Video: काय बोलायचे? चक्क 12 लाख रुपये खर्चून बदलले मानवी शरीराचे रुपडे, झाला कुत्रा; व्हिडिओ व्हायरल)

प्रसारमाध्यमांनी कंपनी आणि संबंधित व्यक्तीच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात म्हटले की, लांगग्यासारखा दिसण्यासाठी आवश्यक पोषाख बनविण्यासाठी या कंपनीला 50 दिवस लागले. पोषाख बनवून आपण जेव्हा आरशासमोर पाहिले तेव्हा आपल्याला आश्चर्यच वाटले. मी खरोखरच मागच्या पायावर चालणाऱ्या लांडग्यासारखा दिसत होतो. महत्त्वाचे म्हणजे पोशाखाला चष्मा लावल्याने केवळ माझी प्राधान्येच पूर्ण केली नाहीत तर पोषाख बणवताना व्हेंटीलेशन सोबत इतरही गोष्टींवर भर देण्यात आला आहे.

दरम्यान, झेपेट कंपनीने आशा प्रकारचा पोषाक बनविण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी टोको नावाच्या व्यक्तीने स्वतःला कुत्र्यामध्ये रूपांतरित केले. त्या वेळीही टोकोला अशा प्रकारचा पोषाख देण्यासाठी कंपनीने 12 लाख रुपये आकारले होते.