Wolf Attack in Bahraich: उत्तर प्रदेशातील बहराईच जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून लांडग्याची दहशत पसरली आहे. त्यामुळे नागरिक घाबरले आहे. धक्कादायक म्हणजे लांडग्याने एका ११ वर्षाच्या मुलावर हल्ला केला आहे. ही घटना बहराईच जिल्ह्यातील पिपरी गावात घडली आहे. यापूर्वी वन विभागाने चार लांडग्यांना रेस्क्यू केले होते. (हेही वाचा- अखेर बहराइच येथील पाचवा लांडग्याला पकडण्यात यश; वनविभागाकडून शोधमोहिम सुरु)
मिळालेल्या माहितीनुसार, बहराइच येथील पिपरी गावात अनेक दिवसांपासून लांडगा भटकत होता. लांडग्याने काल एका ११ वर्षीय मुलावर हल्ला केला. मुलगा आपल्या कुटुंबासह घराच्या छतावर झोपला असताना पहाटे ही घटना घडली. इम्रान अली असं हल्ला झालेल्या मुलाचे नाव आहे. इम्रान अलीचे वडील मोहम्मद अली यांनी सांगितले की, ते छतावर झोपले असताना अचानक लांडगा आला आणि त्याने मुलावर हल्ला केला. त्यांनी मदतीसाठी आरडाओरड केला. लोक जमा झाले होते. लांडग्याने मुलाला गंभीर जखमी केले.
गंभीर मुलाला शासकिय रुग्णालयात दाखल केले. सद्या मुलावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. लांडग्याच्या हल्ल्यामुळे गावकरी घाबरले आहेत. लांडग्याचे हल्ले सुरुत आहेत. त्यामुळे गावातील लोक रात्रीच्या वेळीस बाहेर पडण्यास घाबरत आहे. घटनेची माहिती वन अधिकाऱ्यांना दिली आहे. वन अधिकारी पिपरी गावातील जंगलात लांडग्याचा शोध घेत आहे. परिसरात ऑपरेशन भेडीया सुरु करण्यात आले आहे.