Japan's Minister for Loneliness (Photo credits: Wikimedia Commons)

कोरोना व्हायरस संकट काळात निर्माण झालेल्या स्थितीमुळे नागरिकामंध्ये आलेला एकटेपणा (Loneliness) आणि वाढलेले आत्महत्येचे प्रमाण याबाबत जपान (Japan) सरकार गंभीर आहे. जपान सरकारमधील एक मंत्री तात्सुशी सकामोटो (Tetsushi Sakamoto) यांन म्हंटले आहे की, पंतप्रधान योशीहिदे सुगा यांनी हे एक राष्ट्रीय प्रकरण असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे याबाबत एक स्वतंत्र मंत्रालय (Minister for Loneliness) स्थापन करण्यात येणार आहे. या मंत्रालयाची जबाबदारी माझ्याकडे देण्यात आली आहे, असेही तात्सुशी सकामोटो (Tetsushi Sakamoto) यांनी म्हटले आहे.

तात्सुशी सकामोटो यांनी म्हटले आहे की, कोरोना काळात लोकांमध्ये एकटेपणा प्रचंड वाढला आहे. लोक आत्महत्या करत आहेत. यात प्रामख्याने महिलांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. त्यामुळे देशातील अशा प्रकरणांची बाजू समजून घेण्यासाठी त्यावर उपाययोजना करण्यासाठी हे मंत्रालय काम करणार आहे. या आधी 2018 मध्ये इंग्लंडमध्येही अशा प्रकारचे एक मंत्रालय स्थापण करण्यात आले होते. (हेही वाचा, AstraZeneca-Oxford COVID-19 Vaccine ची प्रथमच 6 ते 17 वयोगटातील मुलांवर चाचणी)

कोरोना काळात जगभरातील इतर देशांप्रमाणेच जपानवरही मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. हे परिणाम आर्थिक, सामाजिक आणि इतर सर्व प्रकारचे आहेत. कोरोना महामारीमुळे केवळ नागरिकांच्या आरोग्याचेच प्रश्न निर्माण झाले नाहीत. तर, समाजिक दुरावाही मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यामुळे जगातील सर्वच देशांना कोरानामुळे विविध आघाड्यांवर लढावे लागते आहे.

प्राप्त माहितीनुसार, जपानमध्ये कोरोनामुळे समाजात मोठ्या प्रमाणावर नैराश्य आले आहे. लोक इंटरनेटचा वापर सर्वाधिक प्रमाणात करु लागले आहेत. सतत ऑनलाईन राहिल्यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर एकटेपणाही वाढतो आहे. एका सर्वेक्षणानुसार, 1,750 युवकांपैकी 16,17 आणि 18 वर्षे वयोगटातील युवकांचा समावश होतात. यातील बहुतांश लोकांनी आपला वेळ इंटरनेटवर खर्च केला.

जपानमध्ये आतापर्यंत 426,000 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे पुढे आले आहे. तर आतापर्यंत 7,577 नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.