Japan मध्ये Brazil च्या प्रवाशांमध्ये आढळतोय ब्रिटन, साऊथ आफ्रिका पेक्षा वेगळा कोरोना वायरस; आरोग्य मंत्रालयाची माहिती
Coronavirus (Photo Credits: Pixabay)

जपानच्या आरोग्य मंत्रालयाला ब्रिटन (Britain) आणि साऊथ आफ्रिका (South Africa) याव्यतिरिक्त अजून एक नवा कोरोना वायरस स्ट्रेन (coronavirus variant ) आढळला आहे. एअर पोर्टवर प्रवासांची तपासणी करताना एका 40 वर्षीय पुरूष, 30 वर्षीय स्त्री आणि दोन टीनेज मुलांमध्ये हा नवा वायरस आढळल्याचं जपानच्या आरोग्य मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. दरम्यान या नव्या वायरस बाबत अजून संशोधन करण्याची गरज आहे. त्यासाठी जपान अन्य देशांसोबत काम करत आहे. जागतिक आरोग्य संघटनेची देखील मदत घेत आहे. अशामध्ये अद्याप कोविड 19 ला रोखण्यासाठी ज्या कोविड 19 लसींना मान्यता देण्यात आली आहे त्या यावरही प्रभावी असतील की नाही? याची शाश्वती देण्यात आलेली नाही.

ज्या पुरूषाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे त्याला कोरोनाची लक्षणं नव्हती पण श्वसनाला त्रास होत असल्याने त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. महिलेला डोकेदुखीचा त्रास जाणवत आहे तर टीनेज मुलाला ताप आहे. पण टीनेज मुलीला कोणतीही लक्षणं दिसून आलेली नाहीत. Coronavirus Pandemic सुरु झाल्यापासून जगभरात कोविड-19 चे चार स्ट्रेन आढळले- WHO.

ब्रिटन आणि साऊथ आफ्रिका मधून आलेल्या म्युटेट व्हेरिएंटचा प्रसार झपाट्याने होत असल्याने त्याबद्दल भीती वर्तवली जात आहे. जपानमध्ये त्याचे 30 रूग्ण आहेत. जपानच्या टोकिओ भागात स्टेट इमरजंसी जाहीर करण्यात आली आहे. या अंतर्गत रात्री 8 वाजता बार, रेस्टॉरंट बंद केले जातात. मात्र रात्री अद्यापही ट्रेनमध्ये गर्दी असल्याने अनेकांनी हे पुरेसे नसल्याचं म्हटलं आहे.

जपानमध्ये आतापर्यंत 2 लाख 80 हजार रूग्ण कोविड 19 चे आहेत तर त्यापैकी 4 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे.