पाकिस्तान: मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माईंड हाफिज सईद याला अटक
हाफिज सईद ( Photo Credit: ANI )

2008 सालच्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माईंड आणि JuD प्रमुख हाफिज सईद (Hafiz Saeed) याला आज(17 जुलै) लाहोर मध्ये अटक  करण्यात आली आहे. या अटकेसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरून दबाब होता. अखेर आज त्याला बेड्या ठोकण्यात यश आलं आहे. पाकिस्तानी मीडियाने दिलेल्या माहितीनुसार हाफिज सईद याला न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली आहे. दहशतवादाला पैसे पुरवल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. जमात-उद-दावा (JUD) या दहशतवादी संघटनेचा संस्थापक आहे तर लष्कर ए तोयबाचा तो सहसंस्थापक आहे. आज लाहोर येथून गुजरनवाला इथे जाताना त्याला अटक करण्यात आली आहे. Pulwama Terror Attack: सहा महिन्यांपूर्वी कराची येथे रचला हल्ल्याचा कट; दहशतवादी हाफिज सईद याने दिली होती धमकी

ANI Tweet 

आंतरराष्ट्रीय समुदयापुढे भारताने अनेकदा पुरावे सादर केले आहेत. त्यामुळे ही अटक महत्त्वाची आहे. यापूर्वी अनेकदा हाफिजला अटक करण्यात आली होती. मात्र त्यानंतर त्याला जामीन मंजूर केले जात होते.हाफिजला पकडून देणार्‍याला 1 कोटी डॉलरचं बक्षीस अमेरिकेने जाहीर केलं होतं. भारताच्या संसदेवरील हल्ल्यामध्येही हफिज सईदचा सहभाग असल्याचा आरोप आहे. आज आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये कुलभूषण जाधवच्या फाशी प्रकरणावर सुनावणी होणार आहे.