Benjamin Netanyahu Nominates Donald Trump for Nobel Peace Prize (Photo Credits: X/@Phil_Lewis_)

इस्त्राईल पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू (Israel PM Benjamin Netanyahu) यांनी अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्र्म्प (Donald Trump)  यांची अमेरिकेत व्हाईट हाऊस (White House)  मध्ये भेट घेतल्यानंतर शांततेसाठी नोबेल पुरस्कारासाठी (Nobel Peace Prize) पाठिंबा जाहीर केला आहे. दोन्ही नेत्यांची खास डिनर दरम्यान भेट झाली. नेत्यानाहूंनी नॉमिनेशन साठीचे नामांकन पत्र देखील ट्रम्प यांना दिले आहे. यावेळी त्यांनी तुम्ही या पुरस्काराचे मानकरी असल्याची भावना व्यक्त केली आहे. याशिवाय इस्त्राईलचे पंतप्रधान नेत्यानाहू यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, पॅलेस्टिनींना चांगले भविष्य देण्यासाठी अमेरिकेसह इस्रायल काही देशांच्या शोधात आहे.

नेतन्याहू यांनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे कौतुक केले आणि म्हटले की, 'मी केवळ इस्रायली लोकांकडूनच नव्हे तर ज्यू समुदाय आणि जगभरातील लाखो चाहत्यांकडून तुमच्या नेतृत्वाबद्दल कौतुक आणि आदर व्यक्त करतो. तुम्ही केवळ मुक्त जगाचे नेतृत्व केले नाही तर न्यायाच्या बाजूने आणि शांतता आणि सुरक्षिततेच्या दिशेने ठोस पावले उचलली.' नेतान्याहू पुढे म्हणाले की, इस्रायल आणि ट्रम्प यांची टीम एकत्रितपणे अनेक आव्हानांना तोंड देत आहेत आणि नवीन संधींचा शोध घेत आहेत. अरब देश आणि इस्रायलमधील शांतता करारासाठी ट्रम्प यांच्या अब्राहम कराराच्या पुढाकाराचे त्यांनी कौतुक केले. नक्की वाचा: Gaza Ceasefire Deal: इस्रायलकडून 60 दिवसांच्या युद्धबंदी प्रस्तावास सहमती; डोनाल्ड ट्रम्प यांची माहिती.  

भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान ट्रम्प यांच्या राजनैतिक पुढाकार आणि मध्यस्थीमुळे मोठ्या युद्धाची शक्यता टळली, असे पाकिस्तानचे म्हणणे आहे. सरकारच्या निवेदनात म्हटले आहे की, ट्रम्प यांनी नवी दिल्ली आणि इस्लामाबाद दरम्यान वाटाघाटी करून युद्धबंदी घडवून आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली ज्यामुळे दोन्ही अणुशक्तींमधील युद्ध टाळता आले.