Donald Trump (PC - File Image)

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी (स्थानिक वेळेनुसार) जाहीर केले की, इस्रायलने गाझामधील प्रस्तावित 60 दिवसांच्या युद्धविरामासाठी आवश्यक अटी स्वीकारल्या आहेत. ट्रम्प यांनी हमासला इशारा दिला की, जर त्यांनी हा करार नाकारला, तर परिस्थिती आणखीनच वाईट होईल. त्यांनी त्यांच्या ‘ट्रुथ सोशल’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले, “माझ्या प्रतिनिधींनी आज गाझाविषयी इस्रायलच्या अधिकाऱ्यांशी दीर्घ व फलदायी बैठक घेतली. इस्रायलने 60 दिवसांच्या युद्धविरामासाठी आवश्यक अटींवर सहमती दर्शवली आहे. या काळात आपण युद्ध समाप्त करण्यासाठी सर्व पक्षांसोबत काम करू. कतार आणि इजिप्त, ज्यांनी शांतता प्रस्थापित करण्यासाठी खूप मेहनत घेतली, ते अंतिम प्रस्ताव सादर करतील. मी आशा करतो की, मध्य पूर्वेसाठी हितकारक ठरणाऱ्या या प्रस्तावाला हमासने मान्यता द्यावी, कारण त्यानंतर परिस्थिती सुधारण्याऐवजी अधिक बिघडेल.”

त्यांनी त्यांच्या ‘ट्रुथ सोशल’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले, “माझ्या प्रतिनिधींनी आज गाझाविषयी इस्रायलच्या अधिकाऱ्यांशी दीर्घ व फलदायी बैठक घेतली. इस्रायलने 60 दिवसांच्या युद्धविरामासाठी आवश्यक अटींवर सहमती दर्शवली आहे. या काळात आपण युद्ध समाप्त करण्यासाठी सर्व पक्षांसोबत काम करू. कतार आणि इजिप्त, ज्यांनी शांतता प्रस्थापित करण्यासाठी खूप मेहनत घेतली, ते अंतिम प्रस्ताव सादर करतील. मी आशा करतो की, मध्य पूर्वेसाठी हितकारक ठरणाऱ्या या प्रस्तावाला हमासने मान्यता द्यावी, कारण त्यानंतर परिस्थिती सुधारण्याऐवजी अधिक बिघडेल.”

डोनाल्ड ट्रम्प यांनी ही घोषणा इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांचा 7 जुलै रोजी होणाऱ्या अमेरिका दौऱ्याच्या काही दिवस आधीच करण्यात आली आहे. दरम्यान, गाझामध्ये इस्रायलचे हवाई हल्ले सुरूच आहेत. अल जझीरा या वृत्तसंस्थेनुसार, सोमवारी इस्रायलने किमान 50 हवाई हल्ले केले असून, त्यातील बहुतांश हल्ले गाझा शहराच्या पूर्वेकडील भागांवर केंद्रित होते. या हल्ल्यांपूर्वी इस्रायली लष्कराने स्थानिकांना स्थलांतराचे इशारे दिले होते.

अल जझीराने वैद्यकीय सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी इस्रायली हल्ल्यांत किमान 68 फिलिस्तिनी नागरिकांचा मृत्यू झाला. यापैकी 47 लोकांचा मृत्यू गाझा शहर आणि उत्तर भागांमध्ये झाला आहे. गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सुरू असलेल्या युद्धात आतापर्यंत किमान 56,500 लोकांचा मृत्यू झाला असून 133,419 लोक जखमी झाले आहेत. त्याच्या तुलनेत, 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर झालेल्या हल्ल्यांत सुमारे 1,139 लोक ठार झाले आणि 200 हून अधिक लोकांना बंदी बनवण्यात आले होते. प्रस्तावित युद्धविरामाच्या काळात चर्चा सुरूच राहणार असून, हा करार हमासकडून स्वीकारला जातो की नाही याकडे जगाचे लक्ष लागून राहिले आहे.