Israel Hamas War Update: गाझात 25000 नागरिकांचा मृत्यू, इस्राइल-हमास युद्धात मोठी हानी

इस्रायल आणि हमास (Israel Hamas War) यांच्यात तीन महिन्यांहून अधिक काळ सुरू असलेल्या युद्धात आता पर्यंत अनेक लोकांनी आपला जीव गमावला आहे. गाझाच्या (GAZA) आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार मृतांची संख्या 25 हजारांच्या पुढे गेली आहे. गेल्या 24 तासांत इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धात किमान 178 जणांचा मृत्यू झाला असून 293 जण गंभीर जखमी झाले आहे. ऑक्टोबरमध्ये हमासने अचानक इस्रायलवर हल्ला केला होता. तेव्हापासून युद्धाला तोंड फूटलं आहे. (हेही वाचा - Israel-Hamas War: युद्धात गाझाच्या शिफा रुग्णालयाची अवस्था बिकट! 30 प्रीमॅच्युअर बेबींना काढण्यात आले बाहेर)

गाझातील परिस्थितीमुळे तेथील सुमारे 85 टक्के लोकसंख्येला त्यांची घरे सोडून जाण्यास भाग पडले आहे. शेकडो हजारो लोकांनी संयुक्त राष्ट्रांचे आश्रयस्थान आणि शिबिरांमध्ये आश्रय घेतला आहे. UN अधिकार्‍यांनी सांगितले की, चालू असलेली लढाई आणि इस्रायली निर्बंधांमुळे, युद्धग्रस्त भागात फारच कमी मदत पोहचली आहे.  7 ऑक्टोबरपासून 25,105 पॅलेस्टिनी ठार झाले आहेत, तर 62,681 इतर जखमी झाले आहेत. अल-किद्राने नमूद केले की इस्त्रायली हल्ल्यांमुळे अनेक मृतक अजूनही ढिगाऱ्याखाली दबले असल्याचे सांगितले.

इस्रायली सैन्याने अंदाजे 9,000 अतिरेक्यांना ठार मारल्याचा दावा केला आहे आणि उच्च नागरी मृत्यूचे कारण म्हणून दाट लोकवस्तीच्या निवासी भागात लढण्यासाठी हमासच्या निवडीला दोष दिला आहे. या हल्ल्याच्या सुरुवातीपासून आतापर्यंत 195 सैनिक मारले गेल्याचेही लष्कराने म्हटले आहे.