Israel-Hamas War: इस्रायल आणि हमास यांच्यात युद्ध सुरू आहे. अशातच ग्राउंड ऑपरेशन करण्यासाठी इस्रायलने आपले संपूर्ण लक्ष शिया हॉस्पिटलकडे वळवले आहे. दरम्यान, गाझाच्या आरोग्य मंत्रालयाकडून एक निवेदन समोर आले आहे, ज्यामध्ये प्रीमॅच्युअर बेबीचा उल्लेख करण्यात आला आहे. दरम्यान, शिफा रुग्णालयातून 30 अकाली बाळांना बाहेर काढण्यात आले. एजन्सीच्या म्हणण्यानुसार, गाझाच्या आरोग्य मंत्रालयाचे म्हणणे आहे की शिफा हॉस्पिटलमधून 30 अकाली बाळांना बाहेर काढण्यात आले आहे, त्यांना इजिप्शियन हॉस्पिटलमध्ये हलवले जाईल. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी प्रिमॅच्युअर बाळांना रुग्णालयातून बाहेर काढण्यात आले. (हेही वाचा - Hamas Lost Control In Gaza: हमासने गमावले गाझारील नियंत्रण; इस्रायली संरक्षण मंत्र्यांचा दावा)
A #UnitedNation's team has evacuated 30 premature babies from Gaza's Al-Shifa hospital, the medical facility said in a statement on Sunday.
Ras Naqoura School in Gaza will soon be accredited as a field hospital to deal with emergency cases, Hamas-controlled Gaza Health Ministry… pic.twitter.com/lCfe2L4vZz
— IANS (@ians_india) November 19, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)