Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: File Image)

जगभरात पुन्हा एकदा दहशत पसरवणाऱ्या इस्लामिक स्टेटने (Islamic State-ISIS) गुरुवारी पहिल्यांदाच माहिती दिली आहे  की, गेल्या महिन्यात वायव्य सीरियामध्ये (Syria) अमेरिकेने केलेल्या हल्ल्यात (US Attack) त्यांचा नेता मारला गेला होता. आयएसनेही आपला नवा प्रमुख निवडला आहे. IS नेता अबू इब्राहिम अल-हाशिमी अल-कुरैशीबद्दल दहशतवादी गटाची ही पहिली अधिकृत टिप्पणी आहे. अमेरिकन अधिकार्‍यांनी सांगितले की अबू इब्राहिम अल-हाशिमी अल-कुरैशीने 3 फेब्रुवारी रोजी तुर्कीच्या सीमेजवळील उत्तर-पश्चिम सीरियातील अटमेह शहरात त्याच्या लपण्याच्या जागेवर हल्ला केला तेव्हा त्याच्या कुटुंबातील सदस्यांसह त्याने स्वत: ला बाॅम्बने उडवले. आयएसचे प्रवक्ते अबू ओमर अल-मुहाजेर यांनी गुरुवारी जारी केलेल्या एका ऑडिओ संदेशात आयएसचा नेता तसेच या गटाचा माजी प्रवक्ता अबू हमजा अल-कुरैशी यांच्या अमेरिकेच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची पुष्टी केली.

कोण झाला नवा नेता?

मुहाजेर म्हणाले की, आयएसने अबू अल-हसन अल-हाशिमी अल-कुरैशी यांची नवीन नेता म्हणून निवड केली आहे. मध्यपूर्वेतील देशांसोबतच इस्लामिक स्टेटने आशियाई देशांनाही लक्ष्य केले आहे. त्याने अलीकडेच पाकिस्तानमधील शिया मशिदीवर आत्मघाती हल्ला केला. या हल्ल्यापूर्वी येथे गोळीबारही करण्यात आला होता. यापूर्वी अफगाणिस्तानमध्ये अशाच प्रकारे अनेक मशिदींना लक्ष्य करण्यात आले आहे. (हे ही वाचा ISIS लिडर अबू इब्राहिम अल हाशिम अल कुरैशी याचा अमेरिकेच्या सैन्याकडून खात्मा, जो बायडेन यांची माहिती)

यानंतर अबू इब्राहिम अल-हाशमी अल-कुरेशी गेल्या महिन्यात उत्तर-पश्चिम सीरियामध्ये अमेरिकन सैन्याने केलेल्या दहशतवादविरोधी कारवाईत मारला गेला. मात्र, इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेकडून याबाबत कोणतेही दुजोरा मिळाला नाही. रिपोर्ट्सनुसार, अबू इब्राहिम अल-हाशिमी अल-कुरैशीचे बालपणीचे नाव अमीर मोहम्मद अब्दुल रहमान अल मावली अल सल्बी होते, त्यांचा जन्म 1976 मध्ये झाला होता. पण, ISIS मध्ये सामील झाल्यानंतर त्याने आपले नाव बदलले.