ISIS लिडर अबू इब्राहिम अल हाशिम अल कुरैशी याचा अमेरिकेच्या सैन्याकडून खात्मा, जो बायडेन यांची माहिती
Joe Biden | (Photo Credits: Facebook)

अमेरिकेच्या दहशतवाद विरोधीत विशेष पथकाने (US Forces) उत्तर पूर्व सीरीयातील आयएसआयएस (ISIS) या दहशतावदी संघटनेचा नेता अबू इब्राहिम अल हाशिम अल कुरैशी (Abu Ibrahim al-Hashimi al-Qurashi) याचा खात्मा केला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायनेड (US President Joe Biden) यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली. जो बायडेन यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, दहशतवाद विरोधी पथकाने विशेष कारवाई करत अबू इब्राहिम अल हाशिम अल कुरैशी याचा खात्मा केला आहे. आपण या संदर्भात सविस्तर वृत्त गुरुवारी देऊ असेही बायडेन यांनी म्हटले आहे. काल रात्री माझ्या निर्देशावरुन अमेरिकी सैन्याने मोठे यश मिळवले आहे. यासोबच दहशतवादी विरोधी अभियान चालवून ISIS नेता अबू इब्राहिम अल हाशिम अल कुरैशी याला ठार मारले असल्याचे बायडेन यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

आयएसआय नेत्याचा खात्मा केल्यानंतर जो बायडेन यांनी अमेरिकेच्या दहशतवाद विरोधी पथकाचे कौतुक केले आहे. तर अनेकांनी अमेरिकी सैन्याला धन्यावद दिले आहेत. या यशस्वी मोहिमेनंतर अमेरिकी सैन्य सुरक्षीतपणे परतले आहे. (हेही वाचा, Pakistan: कंगाल पाकिस्तान IMF कडून घेणार एक अब्ज डॉलरचे कर्ज, पैसे नसल्याने इमरान खान सरकार मेटाकुटीला)

ट्विट

उत्तर सीरियातील इदलिब प्रांतात अमेरिकी सैन्याने राबवलेल्या या मोहिमेत 6 लहान मुलांसह 13 लोकांचे प्राण गेल्याची माहिती आहे. ही मोहीम रात्रभर चालली. अमेरिकी सैन्याने ISIS नेता अबू इब्राहिम अल हाशिम अल कुरैशी लपलेल्या इमारतीला निशाणा बनवले. ही इमारत युद्धामध्ये विस्थापीत झालेले हजारो लोक राहात असलेल्या ठिकाणी आहे.