Pakistan Prime Minister Imran Khan | (Photo Credits: Facebook)

दहशतवाद्यांना पोसणाऱ्या (Terror Funding) आणि भारताशी नेहमीच संघर्षाचा पवित्रा घेणाऱ्या पाकिस्तानवर कंगाल होण्याची वेळ आली आहे. पाकिस्तान आर्थिकदृष्टा इतका कमकुवत झाला आहे की, पंतप्रधान इमरान खान (Imran Khan) यांच्याकडे देश चालविण्यासाठी पैसेच नाहीत. त्यामुळे पाकिस्ताने आता आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे (IMF) हात पसलला आहे. आयएमएफनेही पाकिस्तानला कर्ज देण्याचे कबूल केले आहे. त्यानुसार सुमारे 30 हजार कोटी डॉलर इतके गलेलठ्ठ कर्ज पाकिस्तानला मिळणार आहे. या कर्जामुळे पाकिस्तानची आर्थिक स्थिती काहीशी वधारली तरी हा देश पुन्हा एकदा कर्जबाजारी होणार आहे.

आयएमएफच्या कार्यकारी मंडळाने बुधवारी वॉशिंग्टन डीसी येथे सहावी पडताळणी पूर्ण करण्यासाठी आणि विस्तारीत फंड सेवेच्या माध्यमातून अब्जावदी डॉरचा हप्ता पाकिस्तानला देण्याबाबत चर्चा केली. पाकिस्तानेच अर्थमंत्री शौकत तारिन यांनीही ट्विट करुन याबाबत माहिती दिली आहे. (वाचा - Sri Lanka in Financial Crisis: श्रीलंका आर्थिक टंचाईत, भारताने दिले 50 करोड डॉलर्सचे कर्ज)

पाकिस्तान आणि आयएमएफ यांनी जुलै 2019 मध्ये तीन वर्षांच्या विस्तारीत फंड सेवा सुविधेच्या माध्यमातून आर्थिक नितींवर एक करार केला होता. या करारानुसार पाकिस्तानला 39 महिन्यांच्या कालावधीत सुमारे सहा अब्ज डॉलर दिले जातील. करभरणा नसने ही पाकिस्तानची सर्वात मोठी समस्या आहे. मात्र दहशतवाद हिदेखील पाकिस्तानची सर्वात मोठी समस्या आहे.

पाकिस्तान सातत्याने फायनान्शिअल अॅक्शन टास्क फोर्स (FATF) च्या ग्रे लिस्टमध्ये आहे. 2018 पासून पाकिस्तान या यादीत आहे. त्यामुळे पाकिस्तानला विदेशी गुंतवणूक अथवा निधीही मिळत नाही. त्यामुळे आगामी काळात जगभरात आपली पत वाढवायची असेल तर या देशाला देशांतर्गत करप्रणाली सुधारावी लागेलच. पण त्यासोबतच दहशवादी कारवाया आणि दहशतवाद्यांना पाठिंबा देणे, मदत करणेही थांबवावे लागणार आहे.