
Iran hijab protests: इराणमध्ये सुरु असलेला हिजाब वाद आणखी वाढल्याचे चित्र दिसत आहे. इराणी अभिनेत्री हेंगमेह गझियानीने 'ही माझी शेवटची पोस्ट असू शकते...'अशा आशयाची पोस्ट केली आहे. माध्यमांनुसार, मोठ्या प्रमाणात सरकारविरोधी निदर्शनेला पाठिंबा दिल्याबद्दल अटक होण्यापूर्वी तिने इराणच्या लोकांना एकजुटीने राहण्याबद्दल सांगितले आहे. नागरिकांनी सरकारविरोधी भूमिका घेतल्यास त्यांच्या विरुद्ध कडक कारवाई करण्यात येत आहे. इर्ना वृत्तसंस्थेनुसार, अभिनेत्री हेंगमेह गझियानी आणि कातायुन रियाही यांना इराणच्या अधिकार्यांशी हिजाब विरोधी आंदोलन केल्यामुळे अटक केली आहे. उल्लेखनीय म्हणजे, एकता दर्शविण्यासाठी दोन्ही अभिनेत्री सार्वजनिक ठिकाणी डोक्यावर स्कार्फशिवाय दिसल्या.
पाहा व्हिडीओ :
हिजाब प्रकरणामुळे 22 वर्षीय महसा अमिनी हिला ताब्यात घेतल्यानंतर मृत्यू झाला होता. अधिकाऱ्यांनी दावा केला आहे की, हिजाबसंबंधी निषेध सुरू झाल्यापासून इराणी अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईत अनेक तरुण मारले गेले आणि 16,800 जणांना अटक करण्यात आली आहे. इराण या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, गझियानी आणि रियाही या दोन अभिनेत्रींना रविवारी ताब्यात घेण्यात आले.