इंडोनेशिया (Indonesia) येथे लोम्बोक द्वीप मध्ये 4.4 तीव्रतेच्या भुकंपाचे धक्के जाणवले आहेत. या भुकंपाच्या धक्कात 3 पर्यटकांचा मृत्यू झाला असून काही जण गंभीर जखमी झाले आहेत. तसेच भुकंप झाल्यानंतर जमीन सुद्धा खचली गेली आहे. सिन्हुआ यांनी दिलेल्या वृत्तानुसार, माउंट रिन्जनी येथील सेनारु गावात घडली आहे.
या भुकंपातील दोघेजण मलेशिया मधील आहे. जे अन्य 38 पर्यटकांसोबत येथे आले होते. आपत्ती विभागाच्या एका अधिकाऱ्याने असे म्हटले आहे की, भुस्खलन झाल्याने 38 लोक त्यामध्ये अडकली आहेत. त्यामधील 35 जणांचा बाहेर काढण्यात यश आले आहे. तसेच 20 पर्यटक गंभीर जखमी झाले आहेत.(हेही वाचा-न्युझीलंड मधील क्राइस्टचर्च येथील गोळीबारात 5 भारतीयांचा मृत्यू)
अमेरिकेच्या भूवैज्ञानिकांच्या मते, भुकंप झालेल्या ठिकाणी सेम्बालुन बंबुंग गावापासून चार किलोमीटर दूर दक्षिण-पूर्व येथे 24 किमी खोल स्थित आहे. माउंट रिंन्जनी हा इंडोनेशियातील दुसरा सर्वात उंच ज्वालामुखी असल्याचे मानले जाते.