न्युझीलंड मधील क्राइस्टचर्च येथील गोळीबारात 5 भारतीयांचा मृत्यू
Police vehicles are seen outside a mosque in Christchurch, New Zealand (Photo Credits: IANS)

न्युझीलंड (New Zealand) येथील क्राईस्टचर्च (Christchurch) परिसरातील दोन मशिदीमध्ये झालेल्या अंदाधुंद गोळीबारात पाच भारतीयांचा मृत्यू झाला आहे. तर या गोळीबारात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 50 वर गेली आहे. न्युझीलंड मधील क्राइस्टचर्च येथील गोळीबारात भारतीय जखमी; सुषमा स्वराज यांच्याकडे मदतीचे आवाहन

इंडियन हाय कमिशनने दिलेल्या माहितीनुसार, या दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे महेबूब खोखर, रमीझ वोरा, असिफ वोरा, अंसी अलीबावा आणि ओझेर कादीर अशी आहेत.

इंडियन सोशल अॅण्ड कल्चरल हब ऑफ क्राइस्टचर्च (आयएससीसी) ने दिलेल्या माहितीनुसार, हैदराबादचे 25 वर्षीय ओझेर कादिर हे एविएशन कॉलेजचे विद्यार्थी आणि व्यावसायिक पायलट होते. केरळमधील कोडुंगल्लूर येथील 25 वर्षीय अंसी करिपकुलम अलीबावा लिंकन विद्यापीठातील मास्टर्स विद्यार्थी होते. फरहाज आशान 30 वर्षांची असून त्यांची पत्नी इनशा अझीझ, त्यांची तीन वर्षांची मुलगी आणि सात महिन्यांचा मुलगा आहे. ते शुक्रवारी सकाळी प्रार्थनेसाठी बाहेर पडले होते. गुजरातमधील वडोदरा येथील रामीझ वोरा आणि त्यांचे वडील आसिफ वोरा या गोळीबारात जखमी झाले आहेत.