न्युझीलंड मधील क्राइस्टचर्च येथील गोळीबारात भारतीय जखमी; सुषमा स्वराज यांच्याकडे मदतीचे आवाहन
External Affairs Minister Sushma Swaraj | File Image | (Photo Credits: PTI)

न्युझीलंड (New Zealand) येथील क्राईस्टचर्च (Christchurch) परिसरातील दोन मशिदीमध्ये झालेल्या अंदाधुंद गोळीबारात एक भारतीय जखमी झाला आहे. अहमद जहांगीर असे या भारतीयाचे नाव असून त्याच्यावर न्युझीलंडमधील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. न्यूझीलंड: क्राइस्टचर्च येथील 2 मस्जिदमधील गोळीबारात बांग्लादेश क्रिकेट संघ सुदैवाने बचावला

यासंदर्भात एमआयएचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी टि्वट करुन मदतीचे आवाहन केले आहे. यासाठी त्यांनी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणि तेलंगणच्या मुख्यमंत्री कार्यालयाकडे मदत मागितली आहे. इक्बाल जहांगीर हा अहमद जहांगीर याचा भाऊ असून हैद्राबादचा रहिवाशी आहे. भावाच्या कुटुंबाच्या मदतीसाठी इक्बालला न्युझीलंडला जायचे आहे, यासंदर्भात सुषमा स्वराज आणि तेलंगणा मुख्यमंत्री कार्यालयाने इक्बालसाठी आवश्यक ती व्यवस्था करावी, असे ओवेसी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

तसंच त्यांनी पुढे लिहिले की, "व्हिसा प्रक्रीया जलद गतीने पार पडण्यास सहकार्य करा. बाकी सर्व व्यवस्था तो करेल."

काल (शुक्रवार, 15 मार्च) न्युझीलंडमध्ये झालेल्या गोळीबारात 49 जणांचा मृत्यू झाला. तर भारतीय वंशाचे 9 जण बेपत्ता आहेत.