Indiana Mall Firing: अमेरिकेतील इंडियाना शॉपिंग मॉलमध्ये अंधाधुंद गोळीबार, हल्लेखोरासह चौघांचा मृत्यू
Greenwood Park Mall | (Photo Credit - Twitter/ANI)

अमेरिकेतील इंडियाना (Indiana) येथील ग्रीनवुड पार्क मॉलमध्ये (Greenwood Park Mall) अंधाधुंद गोळीबार (Firing) झाला. या गोळीबारात एक मारेकरी आणि इतर तिघांचा मृत्यू तर इतर तिघे गंभीर जखमी झाले आहेत. अमेरिकेत झालेल्या बंंदूक हिंसेच्या ताज्या घटनेचा उल्लेख करत सरकारी अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. इंडियाना (Indiana Mall Firing) येथील ग्रीनवुडचे मेयर मार्क मायर्स यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, आम्ही आज सायंकाळी (रविवार, 17 जुलै) ग्रीवुड पार्क मॉलमध्ये मोठ्या प्रमाणावर मास शूटींग (गोळीबार) पाहिला.

मायर्स यांनी पुढे बोलताना सांगितले की, इंडियाना येथील मॉलमध्ये झालेल्या गोळीबारात तीन व्यक्ती जागीच ठार झाल्या तर इतर तिघे गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेत एका मारेकऱ्याचाही मृत्यू झाला आहे. हल्लेखोर असलेल्या एका व्यक्तीवर एका बंदुकधारी व्यक्तीने गोळी झाडली. यात त्या मारेकऱ्याचा मृत्यू झाला. (हेही वाचा, भारतीय टेक सेक्टरने दिला तब्बल 2 लाख अमेरिकन लोकांना रोजगार; 2021 मध्ये US ला केली $103 अब्ज उभा करण्यात मदत)

ग्रीनवुड पोलीसांनी आपल्या फेसबुक पेजवर एक पोस्ट शेअर करत म्हटले की, गोळीबार प्रत्यक्ष पाहिलेल्या लोकांनी साक्ष देण्यासाठी पुढे यावे. गन वायलेंन्स आर्काईव्हने म्हटल्यानुसार, हा हल्ला संयुक्तर राज्य अमेरिकेमध्ये बंदुकींच्या माध्यमातून घडलेल्या हिंसाचाराची सर्वात ताजी घटना आहे. अशा प्रकारे घडलेल्या घटनांमधून एका वर्षात साधारण 40,000 लोकांचे मृत्यू होता. त्याला गोळीबाराच्या घटना कारणीभूत असतात.