हजारो डॉलर्स खर्च करुन विकत घेतलेले XXX पॉर्नचे कलेक्शन नष्ट, नाराज झालेल्या पोटच्या मुलाने आई-वडिलांनाच कोर्टात खेचले
प्रातिनिधिक प्रतिमा | (Photo Credit: File Photo)

घरगुती भांडणामुळे मुलाने चक्क आई-वडिलांना कोर्टात खेचल्याचे प्रकरण समोर आले आहे. तर आई-वडिलांवर 86,000 डॉलर्सचा खटला दाखल केला असून XXX पॉर्न व्हिडिओचे कलेक्शन त्यांनी नष्ट केले असल्याचे मुलाने म्हटले आहे. मुलाकडे XXX पोनोग्राफी व्हिडिओचे एक कलेक्शन होते ते नष्ट केल्यामुळे त्याची नुकसान भरपाई आई-वडिलांनी द्यावी असे मुलाचे म्हणणे असल्याने खटला न्यायालयात दाखल केला आहे.

मुलाचा घरातील मंडळींनी एक सिविल केस दाखल केली असून घडलेला प्रकार हा क्रुर नसल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच मुलगा आणि त्याच्या आई-वडिलांच्या नावाची गुप्तता राखण्यात आली आहे. कारण त्यांची ओळख गुप्त राहिली पाहिजे. मुलाने असे सांगितले आहे की, त्याच्या XXX पॉर्न कलेक्शनची किंमत जवळजवळ 29,000 डॉलर आहे. तर कलेक्शनच नष्ट करुन टाकल्यामुळे नाराज झालेल्या मुलाने आपल्या आई-वडिलांविरुद्ध खटला भरवला आहे.(हेही वाचा-माजी XXX पॉर्न स्टार मिया खलीफा हिचा मादक अंदाज, इंटरनेटवर अनेकांचा कलेजा खलास)

WXMI यांच्याकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, कोर्टात दाखल करण्यात आलेल्या कागपत्रांनुसार ऑक्टोंबर 2016 मध्ये घटस्फोट झाल्यानंतर हा मुलगा आई-वडिलांकडे ग्रँन्ड हॅवेन, मिचिगन येथे असलेल्या घरी राहण्यास आला होता. त्याचवेळी आई-वडिलांना मुलाकडे पॉर्न कलेक्शन असल्याचे समजात त्यांनी तो डेटा नष्ट केला असता त्याने पोलिसांत तक्रार केली. परंतु प्रशासनाने या प्रकरणाची तक्रार नोंदवून घेण्यास नकार दिला आहे.

ABC7News यांच्या रिपोर्टनुसार, मुलाने आई-वडिलांना एक ईमेल केला होता. त्यामध्ये असे लिहिले होते की. जर तुम्हाला माझ्या काही गोष्टींचा त्रास होत होता तर तेव्हाच सांगायचे होते. मी निघुन गेलो असतो. तर यावर वडिलांनी उत्तर देत असे म्हटले आहे की, तु विश्वास ठेव अथवा नको ठेवूस तुझ्या भावना आणि मानसिक स्थितीसाठी पॉर्न कलेक्शन नष्ट केले आहे. तर मला आशा आहे तुला ही गोष्ट एखाद्या दिवशी नक्की उमजेल.