प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

बुधवारी नॅसकॉमच्या एका नवीन अहवालात (Nasscom Report) अमेरिकेतील (US) रोजगाराबाबत एक महत्वाची बाब समोर आली. यामध्ये दिसून आले आहे की, गेल्या वर्षी भारतीय तंत्रज्ञान उद्योगाने (Indian Tech Sector) अमेरिकेला तब्बल 103 अब्ज डॉलर उभे करण्यात मदत केली. यासह भारतीय तंत्रज्ञान उद्योगाने यूएसमध्ये 2,07,000 लोकांना थेट रोजगार दिला. अशाप्रकारे $106,360 च्या सरासरी पगारासह, 2017 पासून रोजगारात 22 टक्के वाढ झाली आहे.

भारतीय तंत्रज्ञान उद्योगाच्या थेट परिणामामुळे यूएस अर्थव्यवस्थेला आतापर्यंत $396 अब्जच्या एकूण विक्रीसह मदत झाली आहे आणि 1.6 दशलक्ष नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत. यामुळे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत $198 बिलियन पेक्षा जास्त योगदान मिळाले आहे. 2021 मध्ये हे 20 यूएस राज्यांच्या अर्थव्यवस्थांपेक्षा जास्त होते.

नॅसकॉमचे अध्यक्ष देबजानी घोष म्हणाले, ‘भारतीय टेक सेक्टर फॉर्च्युन 500 पैकी 75 टक्क्यांहून अधिक कंपन्यांसोबत काम करते, ज्यातील बहुतांश कंपन्यांचे मुख्यालय यूएसमध्ये आहे आणि म्हणूनच डिजिटल युगातील गंभीर कौशल्य आव्हाने समजून घेण्यासाठी आणि त्यांना तोंड देण्यासाठी ते सुसज्ज आहे.’

भारतीय तंत्रज्ञान कंपन्यांनी $1.1 बिलियन पेक्षा जास्त योगदान दिले आहे आणि यूएस मधील STEM पाइपलाइन मजबूत आणि वैविध्यपूर्ण करण्यासाठी अंदाजे 180 विद्यापीठे, महाविद्यालये, समुदाय महाविद्यालये आणि इतरांसह भागीदारी विकसित केली आहे. (हेही वाचा: 5G Network In India : भारतात सुरु होणार 5G सर्विस, 26 जुलै पासून 5G लिलावाला सुरुवात)

या व्यतिरिक्त अहवालात असे नमूद केले आहे की. या क्षेत्राद्वारे 2,55,000 पेक्षा जास्त विद्यमान कर्मचार्‍यांना कुशल केले गेले आहे. अमेरिकेत जी काही पारंपारिक टेक हब राज्ये आहेत, त्यांच्याबाहेरही टॅलेंट पूलचा विस्तार करण्यात यूएसमधील भारतीय तंत्रज्ञान उद्योग महत्त्वपूर्ण ठरला आहे. यामुळे यापैकी काही राज्ये उदयोन्मुख टेक हब बनण्यास हातभार लागला आहे. अहवालानुसार, गेल्या दशकभरात, या राज्यांनी त्यांच्या रोजगाराच्या दरात 82 टक्के वाढ केली आहे.

अशाप्रकारे, ‘भारतीय तंत्रज्ञान उद्योग स्थानिक गुंतवणूक, नवकल्पना आणि श्रमशक्तीला प्रोत्साहन देऊन आणि स्थानिक कर्मचार्‍यांसाठी कौशल्य विकास सक्षम करून अमेरिकन अर्थव्यवस्थेत महत्त्वपूर्ण योगदान देत आहे,’ असे घोष म्हणाले.