5G Network In India : भारतात सुरु होणार 5G सर्विस, 26 जुलै पासून 5G लिलावाला सुरुवात
आता भारतात 5G इंटरनेट सेवा वापरता येणार आहे. याच पार्श्वभूमीवर भारत सरकारने देशात 5G स्पेक्ट्रमच्या लिलावाला (5G Spectrum Auction) मंजूरी दिली आहे.
जगातील दुसरे सर्वात मोठे वायरलेस मार्केट (Wireless Market) भारतात (India) आहे. जगभरातील विविध देशात 5G नेटवर्क उपलब्ध असून भारतात देखील लवकरच 5G नेटवर्क (Network) सुरू होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून भारतात 5G सर्विसबाबत चर्चा सुरू आहे. भारतीय यूजर्स 5G सर्विसच्या प्रतिक्षेत आहे. पण भारतीयांची ही प्रतिक्षा लवकरच संपणार असुन आता भारतात 5G इंटरनेट सेवा वापरता येणार आहे. याच पार्श्वभूमीवर भारत सरकारने देशात 5G स्पेक्ट्रमच्या लिलावाला (5G Spectrum Auction) मंजूरी दिली आहे. या लिलावात देशातील मोठमोठ्या टेलिकॉम कंपन्या (Telecom Company) सहभागी होणार असुन या लिलावास 26 जुलैपासून (26 July) सुरुवात होणार आहे.
लिलाव जर जुलैमध्ये पार पडणार आहे तर वर्षाच्या अखेरी पासून भारतीयांना सहज 5G सेवेचा लाभ घेता येण्याची शक्यता नाकारता येणार नाही. याच पार्श्वभुमीवर अनेक कंपन्या भारतात 5G स्मार्टफोन लाँच (Smartphone Launch) करत आहेत. 5G मुळे इंटरनेट स्पीड (Internet Speed) मेगाबाइटवरून (Megabyte) गीगाबाइटवर (Gigabyte) पोहचेल. यामध्ये 4G च्या तुलनेत 100 पट अधिक इंटरनेट स्पीड (Internet Speed) मिळेल. 5G टेक्नोलॉजीचा (Technology) वापर केवळ स्मार्टफोनपुरता (Smartphone) मर्यादित राहणार नाही तर घरातील स्मार्ट इलेक्ट्रीकल उपकरण (Smart Electrical Devices) देखील तुम्हाला 5G ला कनेक्ट (Connect) करता येतील. याशिवाय सार्वजनिक बाबी म्हणजे हॉस्पिटल (Hospital), शैक्षणिक संस्था (Education) , रेल्वे स्थानक (Railway Station) यासंबंधीत व्यवहार देखील अगदी सहज पध्दतीने करता येतील. (हे ही वाचा:-2G, 3G वापरून कंटाळा आला 4G झाले जुने; आता 5G येताच गतीमान होईल जगणे)
जगातील सध्या 34 देश 5G सेवेचा वापर करतात. यात चीन (China), अमेरिका(USA), फिलीपाईन्स (Philippines), साउथ कोरिया (South Korea), कॅनडा (Canda), स्पेन (Spain), इटली (Itlay), जर्मनी (Germany), युके (UK), सउदी अरेबीया (Saudi Arebia) या सारख्या देशांचा समावेश आहे. भारतात 5G सर्विस सुरु झाल्यास भारत जगातील 35 देश असेल जिथे 5G चा वापर करण्यात येईल. 5G उत्सुकता संपूर्ण भारतीयांना लागली आहे. तरी 2023 नवीन वर्षाच्या मुहूर्तावर भारतात 5G सर्विस सुरु होण्याची दाट शक्यता आहे.
(The above story first appeared on LatestLY on Jul 13, 2022 01:16 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

