प्रेमात आंधळा झालेल्या भारतीय तरुणाची पाकिस्तान येथून 6 वर्षानंतर घरवापसी
हामिद निहाल अंसारी (Photo Credits: Twitter)

Islamabad: प्रेमामध्ये काही लोक एवढे आंधळे होतात की त्यांना प्रेम आणि प्रेयसी व्यतिरिक्त काहीच दिसत नाही. अशीच एक घटना मुंबईत राहणाऱ्या हामिद निहाल अन्सारी (Hamid Nehal Ansari) या तरुणासोबत झाली आहे.

हामिद याची फेसबुक वरुन एका तरुणीशी प्रेमसंबंध जुळले. या तरुणीला भेटण्यासाठी हामिदने अफगाणिस्तानच्या मार्गाने पाकिस्तानमध्ये प्रवेश केला. त्यामुळे पाकिस्तानमध्ये त्याला गुप्तचर यंत्रणेचा व्यक्ती आणि कोणत्याही ओळपत्रांशिवाय फिरण्यास आल्याच्या अरोपामध्ये अटक करण्यात आली.

पाकिस्तानच्या उच्च न्यायालयाने हामिद बद्दल दिलेल्या निर्णयाला 15 डिसेंबर रोजी त्याची 3 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा पूर्ण झाली. तसेच हामिदला कायद्यानिशी सुटकेसाठी एका महिन्याचा कालावधी देण्यात आला होता. तर 15 डिसेंबर 2015 पासून पाकिस्तानच्या तुरुंगात शिक्षा भोगत असलेला हामिद आज तब्बल सहा वर्षांनी घरी जाणार आहे.