भारतीय मूळ असलेल्या Naureen Hassan यांची फेडरल रिझर्व्ह बँक ऑफ न्यूयॉर्कच्या VP आणि COO म्हणून नियुक्ती
Naureen Hassan (Photo Credits: Twitter)

वित्तीय सेवा क्षेत्रातील विस्तृत अनुभव असलेल्या मूळ भारतीय व आता अमेरिकन नागरिक असलेल्या नौरिन हसन (Naureen Hassan) यांना फेडरल रिझर्व्ह बँक ऑफ न्यूयॉर्कचे (Federal Reserve Bank of New York) उपाध्यक्ष (VP) आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (COO) म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. त्या बँकेच्या पहिल्या व्हीपी असतील. त्यांचा कार्यकाळ 15 मार्चपासून सुरू होईल. बँकेने म्हटले आहे की नौरिन यांची नियुक्ती फेडरल रिझर्व सिस्टमच्या गव्हर्नर बोर्डाने मंजूर केली आहे. पहिल्या व्हीपी म्हणून नौरिन फेड रिझर्व्हमधील दुसऱ्या सर्वात मोठ्या अधिकारी असतील. तसेच त्या फेडरल ओपन मार्केट कमिटीच्या अल्टरनेट व्होटिंग मेंबरही असतील.

नौरिन यांना 25 वर्षांचा विविध वित्तीय कंपन्यांचा अनुभव आहे. या नियुक्तीपूर्वी त्यांनी मॉर्गन स्टेनली वेल्थ मॅनेजमेन्टच्या चीफ डिजीटल ऑफिसर म्हणून काम पाहिले आहे. हसन यांनी धोरण, डिजिटल परिवर्तन आणि सायबर सुरक्षा क्षेत्रातील कौशल्य असलेल्या अनेक क्षमतांमध्ये काम केले आहे. हसन, ज्यांचे पालक केरळमधील स्थलांतरित आहेत, ते मॉर्गन स्टेनली मध्ये वेल्थ मॅनेजमेंटचे मुख्य डिजिटल अधिकारी आणि इन्व्हेस्टमेंट बँकेमध्ये वेल्थ मॅनेजमेंट संचालन समितीचे सदस्य होते. (हेही वाचा: इमरान खान यांची खुर्ची थोडक्यात वाचली, Pakistan संसदेत बहुमत सिद्ध; 178 मतांनी जिंकला विश्वासदर्शक ठराव)

न्यूयॉर्क फेडरल बँकेचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जॉन सी. विल्यम्स यांनी नमूद केले की, 'नौरिन यांची लीडरशिपची  पार्श्वभूमीवर असून त्यांनी अनेक संघांचे नेतृत्व केले आहे. त्यांच्याकडे वित्तीय क्षेत्रातील दांडगा अनुभव आहे. नौरिन या पदावर राहून इतरांना प्रेरणा देतील आणि अभिनवसमवेत संघाचे नेतृत्व करतील असा मला विश्वास आहे.' नौरिन यांनी स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी ग्रॅज्युएट स्कूल ऑफ बिझिनेसमधून बिझिनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन मध्ये पदव्युत्तर पदवी घेतली आहे.