Imran Khan Secures Majority: इमरान खान यांची खुर्ची थोडक्यात वाचली, Pakistan संसदेत बहुमत सिद्ध;  178 मतांनी जिंकला विश्वासदर्शक ठराव
Imran Khan | (Photo Credits: Facebook)

पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान (Pakistan PM Imran Khan) हे आपले सरकार वाचविण्यात यशस्वी ठरले आहे. इमरान खान (Imran Khan) हे पाकिस्तानच्या संसदेत विश्वासदर्शक ठरावाला सामोरे गेले. त्यांनी बहुमत सिद्ध करत हा विश्वासदर्शक ठराव जिंकला. (Imran Khan Secures Majority) विश्वासदर्शक ठराव जिंकण्यासाठी इमरान खान यांना एकूण 172 मतांची आवश्यकता होती. खान यांना त्याही पेक्षा अधिक म्हणजे 172 मतं मिळाली. त्यानंतर सभागृह अध्यक्षांनी इमरान खान सरकार सुरक्षीत असल्याची घोषणा केली.

पाकिस्तानच्या संसदीय इतिहासात इमरान खान हे दुसरे असे पंतप्रधान ठरले आहेत. जे स्वच्छेने विश्वासदर्शक ठरावाला सामोरे गेले आणि त्यांनी तो ठराव जिंकलासुद्धा. या आधी 1993 मध्ये नावाज शरीफ यांनी पंतप्रधान असताना पाकिस्तानच्या संसदेत अशाच प्रकारे विश्वासदर्शक ठरावाला स्वेच्छेने सामोरे जाण्याचे धाडस दाखवले होते. (हेही वाचा, Imran Khan on Pakistan Army: पाकिस्तानी लष्कर दबावात- इमरान खान)

सभागृहात विरोधकांकडून मांडण्यात आलेल्या अविश्वास ठरवाला इमरान खान यांच्या तहरीक ए इन्साफ पक्षाचे खासदार अब्दुल हफीज शेख यांनी जोरदार खिंड लढवली. त्यांना पाकिस्तान डेमोक्रेटिक मूवमेंट पक्षाचे उमेदवार आणि माजी पंतप्रधान युसूफ रजा गिलानी यांनी जोरदार टक्कर दिली. इमरान खान सरकारसाठी हा मोठा झटका मानला जात आहे. इमरान खान यांनी स्वत: शेख यांच्यासाठी प्रचार केला होता. गिलानी यांच्या विजयाने उत्साहीत झालेल्या विरोधकांनी इमरान सरकारचा राजीनामा मागण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर इम्रान खान यांनी संसदेत बहुमत सिद्ध करण्याची घोषणा केली होती.

दरम्यान, विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाताना इम्रान खान यांनी पक्षाच्या खासदारांना व्हिप जारी केला होता. व्हीप जारी करण्यापूर्वी भावूक होत इम्रान खान यांनी म्हटले होते की, मतदान झाल्यावर जो निर्णय येईल त्या निर्णयाचा आपण सन्मान करु. जर बहुमत सिद्ध करता आले नाही तरत आपण विरोधात बसायला तयार आहोत, असेही इमरान खान यांनी म्हटले होते.