जगभरात झपाट्याने पसरणारा कोरोना व्हायरस आता मृत्यूचं युरोप, अमेरिकेमध्ये मृत्यूचं तांडव घालत आहे. दरम्यान भारतीय वंशाचे सेलिब्रिटी शेफ Floyd Cardoz यांचा न्यूयॉर्कमध्ये मृत्यू झाला आहे. 19 मार्चला त्यांची कोव्हिड 19 ची चाचणी पॉझिटिव्ह आली होती. दरम्यान मागील महिन्यात ते मुंबईमध्येही आले होते. त्यामुळे त्यांच्या मागील महिन्यातील मुंबई दौर्यात संपर्कात आलेल्यांना या प्रकाराची माहिती देऊन काळजी घेण्याचं सांगण्यात आलं आहे. दरम्यान Floyd Cardoz यांचा जन्म मुंबईमध्ये झाला होता. त्यानंतर ते काही काळ मुंबई आणि गोव्यामध्ये होते. बायोकेमेस्ट्रीचं शिक्षण घेतलेले Floyd Cardoz यांनी नंतर मुंबई आणि अमेरिकेमध्ये हॉटेल व्यवसायाला सुरूवात केली. फ्लॉएड कार्डोज यांच्या निधनाची बातमी समजताच मुंबईमध्ये राहुल बोस, टिस्का शर्मा सह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हळहळ व्यक्त केली आहे.
फ्लॉएड कार्डोज यांची Bombay Canteen, O'Pedro and Bombay Sweet Shop ही प्रसिद्ध हॉटेल्स आहेत. न्यूयॉर्कमध्येही त्यांची हॉटेल्स लोकप्रिय आहे. मुंबई शहरातील Hunger Inc चे ते सह संस्थापक आहेत. तर याची 3 रेस्ट्रॉरंट आहेत. हॉटेल्स सोबतच त्यांची पाककला शास्त्रावरील पुस्तकं देखील लोकप्रिय आहेत. कोरोनाचे नवे टार्गेट अमेरिका? एकाच दिवसात 10 हजार नागरिकांना COVID19 ची लागण: WHO.
अमेरिकेमध्ये सध्या कोरोना व्हायरस थैमान घालत आहे. दरम्यान अमेरिकेत काही दिवसांपूर्वी केवळ 24 तासामध्ये 100 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता तर एकाच दिवसात 10 हजारहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाल्याचं वृत्त आहे. त्यामुळे चीन, युरोपात थैमान घातल्यानंतर आता कोरोनाचे नवे टार्गेट अमेरिका होऊ शकते अशी भीती WHO ने व्यक्त केली आहे. भारतामध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा 600 च्या पार गेला आहे.