विदेशातील पैसा मायदेशी पाठवण्यात भारतीय आघाडीवर: जागतिक बँक
मायदेशात पैसा पाठवण्यात भारतीय आघाडीवर | (Photo courtesy: archived, edited, images)

विदेशातून पैसा मायदेशी पाठवण्यात भारतीयांचा क्रमांक सर्वात अव्वल आहे. 2018 या वर्षात भारतीयांनी आपले स्थान कायम राखले आहे. जागतिक बँकेने (World Bank) प्रसिद्ध केलेल्या 'मायग्रेशन अण्ड रेमिटेन्स' ( Migration and Remittances) या अहवालानुसार, विदेशातील भारतीयांनी यंदा भारतात तब्बल 80 अब्ज डॉलर इतके पैसे भारतात पाठवले आहेत. भारतानंतर मायदेशी पैसे पाठवणाऱ्यांमध्ये चीन दुसऱ्या क्रमांकवर आहे. चीनच्या नागरिकांनी 2018मध्ये 67 अब्ज डॉलर इतका पैसा भारतात पाठवला आहे. भारत आणि चीन यांच्यानंतर मॅक्सिको, फिलिपीन्स, इजिप्त आदी देश आघाडीवर आहेत. या देशांनी अनुक्रमे 34,34 आणि 16 अरब डॉलर इतके पैसे मायदेशी पाठवले आहेत.

जागतिक बँकेने प्रसिद्ध केलेल्या 'मायग्रेशन अण्ड रेमिटेन्स' ( Migration and Remittances) या अहवालात दिलेल्या माहितीनुसार, मायदेशी पैसे पाठवण्यात भारती आघाडीवर आहेत. बँकेचे अनुमान सांगते की, विकसनशिल देशांमध्ये पाठवण्यात आलेल्या अधिकृत रूपात पाठवण्यात आलेल्या पैशांमध्ये 2018 या वर्षा 10.8 टक्क्यांची वाढ होऊन तो आकडा 528 अरब डॉलरवर पोहोचला आहे. गेल्या वर्षी हाच आकडा 7.8 टक्के इतकी वाढ दर्शवत होता.(हेही वाचा, अर्थसल्ला: स्टॉक मार्केटच्या तुलनेत म्युच्युअल फंडात गुंतवणूक किती सुरक्षित..?)

जगभरातून आपापल्या मायदेशात पाठविण्यात येणाऱ्या पैशांचा आकडा यंदा 10.3 टक्क्यांनी वाढून तो 689 अरब डॉलरवर पोहोचल्याचा दावा करण्यात येत आहे. जागतिक बँकेच्या अहवालात म्हटले आहे की, गेल्या तीन वर्षांमध्ये भारतात पाठविण्यात आलेल्या पैशांमध्या प्रामुख्याने वाढ झाली आहे. 2016 मध्ये ही टक्केवारी 62.7 अरब डॉलरवरुन 2017मध्ये ती 65.3 अरब डॉलरवर पोहोचली. 2017मध्ये विदेशातून भारतात पाठविण्यात आलेले एकूण घरगुती उ्तपादन (GDP)2.7 टक्के इतकी होती.