पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत आल्यास शांततेवर चर्चा होईल: इम्रान खान
Imran Khan (Photo Credits-Twitter)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) पुन्हा एकदा सत्तेत आल्यास शांततेवर चर्चा होईल असे पाकिस्तान (Pakistan) पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांनी म्हटले आहे. त्याचसोबत जर काँग्रेस (Congress) पक्षाची सत्ता आल्यास त्यांच्याकडून शांततेवर चर्चा होणे अशक्य असल्याचे सुद्धा इम्रान खान यांनी म्हटले आहे. 11 एप्रिल पासून भारतात 91 जागांसाठी मतदानाला सुरुवात होणार आहे.

तत्पूर्वी इम्रान खान यांनी निवडणुकीपूर्वीचे आणि निवडणुकीनंतर अशा दोन पद्धतींचे नरेंद्र मोदी आपल्याला पाहायला मिळणार असल्याचे विधान केले आहे. तसेच पुलवामा हल्ल्यात भारताचे 40 जवान शहीद झाल्यानंतर वायुसेनेने पाकव्याप्त काश्मिरमधील दहशतवादी तळांवर हल्ला करत अनेक दहशतवाद्यांचा खात्मा केला. त्यानंतर पाकिस्तानने भारताचे लढाऊ विमान पाडले आणि वैमानिक अभिनंदन ह्याला ताब्यात घेतले होते. अशा सर्व घडामोडी गेल्या एक महिन्यात घडल्या आहेत. परंतु भाजप पुन्हा सत्तेत आल्यास चर्चा करण्यास तयार असल्याचे म्हटले आहे.(हेही वाचा-गरीबीच्या उंबरठ्यावर पाकिस्तान; दोन ऐवजी एक चपाती खा- इम्रान खान सरकारचा सल्ला)

भारतीय वायुसेनेने केलेल्या कारवाईनंतर पाकिस्तानला त्याचे प्रतिउत्तर देणे भागच होते. कारण प्रतिउत्तर न दिल्यास लोकांकडून प्रचंड टीका करण्यात आली असती असे इम्रान खान म्हणाले. त्याचसोबत भारताने केलेल्या कारावाईनंतर आम्ही दहशतवाद संपवण्यासाठी प्रयत्न करत बऱ्याच दहशतवाद्यांना अटक केली असल्याची माहिती इम्रान खान यांनी सांगितले.