इम्रान खान आणि पीएम मोदी (Photo Credit-IANS)

पाकिस्तानचे (Pakistan ) माजी पंतप्रधान इम्रान (Imran Khan) खान यांची भारत (India) आणि मोदी सरकार (Modi Government) विरुध्द कारवाईची मागणी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार (International Human Rights) संघटनांनाकडे धाव घेतली आहे. इम्रान खान पाकिस्तानचे पंतप्रधान असतांना कायम भारत विरोधी किंवा मोदी सरकारविरोधी कारवाईची मागणी करण्यात अग्रेसर असायचे. पण आता इम्रान खान यांनी पुन्हा एकदा आंतराष्ट्रीय स्तरावर भारत विरोधी टीकेची झोड उठवली आहे. तसेच भारत विरोधी कारवाईच्या मागणीसाठी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनांनाशी संपर्क साधला आहे. एवढचं नाही तर मोदी सरकार विरुध्द UNSG सह UNHCHR या आंतराष्ट्रीय संघटनांनी लक्ष घालावं अशी मागणी केली आहे.

 

जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटचा (Jammu and Kashmir Liberation Front) प्रमुख यासीन मलिकचा (Yasin Malik) दिल्लीच्या (Delhi) तुरुंगात छळ केला जात आहे आणि त्याला तुरुंगात उपोषण करण्यास भाग पाडले जात असल्याचे गंभीर आरोप पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी भारतावर केलेले आहेत. तसेच यासिनची पत्नी मुशाल हुसैन मलिक (Mushan Hussain Malik) ही देखील धोक्यात असल्याचा खळबळजनक दावा इम्रान खान यांनी केला आहे. यासिन मलिकचा जीव वाचवण्यासाठी UNSG, UNHCHR आणि आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनांना या प्रकरणी हस्तक्षेप करण्याची मागणी इम्रान खान यांनी केली आहे. (हे ही वाचा:- Britain Election: भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांची अभूतपूर्व मुसंडी, युकेच्या पंतप्रधान पदापासून आता फक्त एक पाऊल लांब)

 

काश्मिरी फुटीरतावादी नेता यासिन मलिक याला न्यायालयानं (Court) 25 मे रोजी जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. 'दहशतवादी' कारवायांसाठी  (Terrorist Activities) निधी उभारल्याबद्दल मलिकला आजीवन कारावासाची शिक्षा देण्यात आली आहे. तसेच यासिन मलिकवर तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या मुलीगी रुबिया सईद यांचे अपहरण करण्यासारखे अनेक आरोप आहेत. तरी पाकिस्तानसह यासिनची पत्नी मुशाल हुसैन मलिकयांच्याकडून कायमचं यासिन मलिक निर्दोष असल्याचे दावे केले जातात.