Muhammad Yunus, Durga Puja (फोटो सौजन्य - X/@Gaudeshwar)

Bangladesh’s Hindu Temples Extortion Threats: बांगलादेशातील (Bangladesh) हिंदूंवरील अत्याचार थांबायचं नाव घेत नाहीत. दुर्गापूजेपूर्वी (Durga Puja 2024) काही हिंदू मंदिरांना (Hindu Temples) बांगलादेशातील इस्लामिक गटांकडून धमक्या मिळाल्या आहेत. मंदिर समित्यांना दुर्गापूजा साजरी करायची असेल तर 5 लाख रुपये द्यावे लागतील. पैसे दिले नाहीत तर पूजा करू देणार नाही, अशी धमकी देण्यात आली आहे. हिंदू बौद्ध ख्रिश्चन एकता परिषदेचे सरचिटणीस महेंद्र नाथ यांनी सांगितले की, खुलना शहरातील दाकोप शहरातील 25 मंदिरांना पाच दिवसांचा उत्सव साजरा करण्यासाठी 5 लाख रुपयांची मागणी करणाऱ्या धमक्या मिळाल्या आहेत.

महेंद्र नाथ यांनी पुढे बोलताना सांगितले की, मंदिरांनी खंडणीच्या धमक्यांविरोधात पोलिसांकडे तक्रार केली आहे. पोलिसांनी मंदिर समित्यांना उत्सवासाठी संरक्षण देण्याचे आश्वासन दिले आहे. धमक्यांमुळे काही पूजा करणाऱ्या समित्यांनी उत्सव रद्द केले आहेत. 9 ते 13 ऑक्टोबर दरम्यान दुर्गापूजा साजरी केली जाणार आहे. (हेही वाचा -Bangladesh Crisis: बांगलादेशचे नवे प्रमुख Muhammad Yunus यांचा PM Narendra Modi यांना फोन; दिले हिंदू आणि इतर अल्पसंख्याकांचे संरक्षण आणि सुरक्षेचे आश्वासन)

काही दिवसांपूर्वी मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील बांगलादेशच्या अंतरिम सरकारने अजान आणि नमाजच्या वेळी दुर्गापूजेचे संगीत वाजवू नये, असा आदेश जारी केला होता. (हेही वाचा - No Durga Puja Activities During Namaz: बांगलादेशमध्ये अजान आणि नमाज दरम्यान दूर्गापूजा उत्सवावर निर्बंध)

दरम्यान, 22 सप्टेंबर रोजी लक्ष्मीगंज जिल्ह्यातील रायपूर भागात मदरशातील काही लोकांनी दुर्गा मूर्ती तोडल्या होत्या. बरगुना जिल्ह्यातही पुतळ्यांची तोडफोड करण्यात आली होती. हिंदू समाजातील काही लोकांनी या प्रकरणी चितगाव आणि खुलना येथील जिल्हा अधिकाऱ्यांकडे तक्रारीही केल्या होत्या.