पुलवामानंतर लंडनमध्ये दहशतवादी हल्ल्याचा कट? तीन ठिकाणांहून स्फोटके जप्त, तपास सुरु
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Getty Images)

पुलवामा हल्ल्यानंतर भारतात सर्वत्र सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत, मोठमोठ्या शहरांत हाय अलर्ट लागू करण्यात आला आहे. मात्र त्यानंतर आता लंडन येथे घातपाताचा कट केला असल्याचा उघडकीस आले आहे. हीथ्रो विमानतळ (Heathrow Airport), लंडन शहर विमानतळ (London City Airport) आणि वॉटरलू रेल्वे स्टेशन (Waterloo Station) वर बॉम्ब असल्याची माहिती दहशतवादविरोधी पोलीस पथकाला मंगळवारी (6 मार्च) मिळाली. ही माहिती मिळताच पोलिसांच्या पथकाने कसून तपासणी करून छोट्या बॅगमध्ये सापडलेली स्फोटके हस्तगत केला आहेत. या घटनेनंतर लंडन शहरातील सुरक्षेमध्येही वाढ करण्यात आली आहे.

अशा प्रकारे स्फोटके असल्याचे माहिती पोलीस पथकाला मिळाली, त्यानंतर सकाळी 9.55 वाजता हीथ्रो विमानतळावरून पहिले स्फोटक जप्त करण्यात आले. 11.40 ला वॉटरलू रेल्वे स्टेशनवर स्फोटके सापडली, त्यानंतर दुपारी 12:10 वाजता लंडन शहर विमानतळावर स्फोटके सापडली. हे बॉम्ब लहान आकाराचे होते, त्यामुळे त्यांचा स्फोट जरी झाला असता तरी फार नुकसान झाले नसते असे पोलिसांनी सांगितले आहे. (हेही वाचा: अमेरिकन गुप्तचर खात्याचा धक्कादायक खुलासा: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतावर होऊ शकतो दहशतवादी हल्ला)

मात्र एकाचवेळी 3 ठिकाणी बॉम्ब सापडणे ही धोकादायक गोष्ट असल्याचे सांगितले जात आहे. यामागे नक्की काय उद्देश होता याचा पोलीस शोध घेत आहेत. सध्या पुलवामा हल्ल्यानंतर लंडनमध्ये तर दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता नाही ना? अशी शंका व्यक्त केली जात आहे.