Hindu Temple Vandalised in Canada: कॅनडा (Canada) च्या एडमंटन (Edmonton) मध्ये एका हिंदू मंदिराची तोडफोड (Hindu Temple Vandalised) करण्यात आली असून भिंतींवर भित्तिचित्रे रंगवण्यात आली आहेत. या घटनेनंतर कॅनडातील विश्व हिंदू परिषदेने याचा निषेध केला आहे. तसेच कॅनडा सरकारला वाढत्या अतिरेकी विचारसरणीविरुद्ध कारवाई करण्याचे आवाहन केले आहे.
संघटनेने एका एक्स-पोस्टमध्ये लिहिले आहे की, 'VHP कॅनडा एडमंटनमधील BAPS मंदिरातील हिंदूफोबिक भित्तिचित्र आणि तोडफोडीचा तीव्र निषेध करते. आम्ही कॅनडातील सर्व स्तरावरील सरकारांना आमच्या देशातील शांतताप्रिय हिंदू समुदायाविरुद्ध द्वेष पसरवणाऱ्या वाढत्या अतिरेकी विचारसरणीविरुद्ध निर्णायकपणे कार्य करण्याचे आवाहन करतो.' (हेही वाचा - Hindu Temple Vandalised in Windsor: कॅनडा मध्ये हिंदू मंदिरावर पुन्हा भारत आणि हिंदू विरोधी ग्रॅफिटी; 2 संशयित पोलिसांच्या निशाण्यावर)
SHAME ON TRADEAU- BAPS Swaminarayan Mandir (a Hindu temple) in Edmonton, Canada, is vandalised again. pic.twitter.com/a5alakd5eQ
— Frontalforce 🇮🇳 (@FrontalForce) July 23, 2024
Hindu Temple vandalised again in Canada amid rising concerns over extremist activities
Read @ANI Story | https://t.co/Rsw0lShoeo#HinduTemple #Canada pic.twitter.com/IwLLadnsHC
— ANI Digital (@ani_digital) July 23, 2024
अलीकडच्या काळात खलिस्तानी फुटीरतावाद्यांकडून मंदिराची अशी भित्तिचित्रे करून विद्रुपीकरण करण्याची ही पहिलीच घटना नाही. खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या मृत्यूनंतर खलिस्तान समर्थकांच्या भारतविरोधी कारवाया वाढल्या आहेत.