भारतात जेव्हा स्वातंत्र्य दिन साजरा केला जात होता त्याचवेळी अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) तालिबान (Taliban) यांनी आपला ताबा मिळवला. काबुल मध्ये प्रवेश करण्यासह त्यांनी राष्ट्रपती भवनावर ही आपले वर्चस्व स्थापित केले. ऐवढेच नाही तर राष्ट्रपती अशरफ गनी यांनी सुद्धा देशातून पलायन केले. सध्या इंटरनेटवर अफगाणिस्तानातील परिस्थितीचे भयावह फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत. भारतासह काही देशातील नागरिकांनी आपल्या नागरिकांची तेथून सुटका करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.
अफगाणिस्तानावर तालिबान्यांच्या आता ताबा असल्याने नागरिक घाबरुन विमानतळ आणि देशाच्या बॉर्डवर पोहचले असून तेथे त्यांनी तुफान गर्दी केली आहे. तर काबुल मधून सर्व नागरिक पळ काढण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र दुसऱ्या बाजूला अफगाणिस्तानातील हिंदू पंडित राजेश कुमार यांनी देश सोडण्यास नकार दिला आहे. त्यांनी असे म्हटले की, मंदिरातून मी कुठेही जाणार नाही. जरी तालिबान्यांनी मला ठार मारले तरीही माझी सेवा करत राहीन.(Afghanistan-Taliban Conflict News: अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या 120 भारतीयांना घेऊन C-17 विमान काबुलहून रवाना, भारतात पुन्हा प्रवेशासाठी सरकारकडून फास्ट ट्रॅक व्हिसाची सेवा सुरू)
राजेश कुमार यांनी असे म्हटले की, माझ्या पुर्वजांनी शेकडो वर्षांपासून या मंदिरात सेवा केली आहे. मी या मंदिराला सोडणार नाही. जर मला तालिबान्यांनी मारले तर ती सुद्धा माझी सेवा असेल असे मानून घेईन. दरम्यान, अफगाणिस्तानवर आता तालिबान्यांनी ताबा मिळवला आहे. देशातील अल्पसंख्याक आपला जीव वाचवण्यासाठी दुसऱ्या शहरात पलायन करत आहेत. काबुलसह अन्य काही शहरात गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.(Joe Biden On Afghanistan Crisis: अफगाणिस्तानवर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी सोडले मौन; सैन्य माघारीवर ठाम)
राष्ट्रपती अशरफ गनी यांनी देशातून पलायन केले आहे. त्यामुळे आता अन्य नेते सुद्धा आपला जीव वाचवण्यासाठी दुसऱ्या शहरात जात आहेत. अफगाणिस्तानातील काही नेता भारतात पोहचले आहेत. तालिबानने सुद्ध संपण्याचे जाहीर केले असले तीरीही काबुल येथून लूटमार आणि हिंसेच्या बातम्या समोर येत आहेत. भारताने अफगाणिस्तानात निर्माण झालेल्या परिस्थितीवर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत चिंता व्यक्त केली आहे.