Helicopter Crash प्रतिकात्मक प्रतिमा (PC- pixabay)

Helicopter Crash In Norway: पश्चिम नॉर्वे (Norway) जवळ समुद्रात हेलिकॉप्टर कोसळल्याने (Helicopter Crash) एकाचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहेत. ब्रिस्टो नॉर्वेने चालवलेले सिकोर्स्की S-92 विमान बुधवारी शोध आणि बचाव प्रशिक्षण मोहिमेवर होते. त्यावेळी हा अपघात झाला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. बचाव कर्मचाऱ्यांनी जहाजावरील सहा जणांना समुद्रातून बाहेर काढले. परंतु नंतर एकाला रुग्णालयात मृत घोषित करण्यात आले, असे पोलिसांनी गुरुवारी एका निवेदनात म्हटले आहे.

पाच वाचलेल्यांपैकी एकाला किरकोळ दुखापत झाली, तर इतर चार जणांना मध्यम ते गंभीर दुखापत झाली. अपघाताचे नेमके कारण लगेच कळू शकले नाही. हेलिकॉप्टर बनवणारी लॉकहीड मार्टिन कंपनी सिकोर्स्कीने बुधवारी सांगितले की, सुरक्षितता ही आपली सर्वोच्च प्राथमिकता. त्यामुळे या अपघाताचे कारण शोधण्यास कंपनी सहकार्य करेल. (हेही वाचा - Mali Accident: मालीमध्ये बस पुलावरुन थेट नदीत कोसळली, 31 प्रवाशांचा मृत्यू)

एनर्जी ग्रुप इक्विनॉरने सांगितले की, हेलिकॉप्टर एक शोध आणि बचाव विमान आहे. जे सामान्यत: उत्तर समुद्रातील कंपनीच्या ओसेबर्ग तेल आणि वायू क्षेत्रात प्लॅटफॉर्मवर सेवा देत होते.