Mali Accident: मालीमध्ये बस पुलावरुन थेट नदीत कोसळली, 31 प्रवाशांचा मृत्यू
Accident (PC - File Photo)

आफ्रिकन देश मालीमध्ये (Mali Accident) एक बस पुलावरून कोसळून झालेल्या अपघातात 31 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे, तर 10 जण जखमी झाले आहे. नदीवरील पुलावरून बस खाली पडल्याची घटना केनिबा परिसरात घडली.  बुर्किना फासोच्या दिशेने जाणारी बस देशाच्या दक्षिण-पूर्व भागात असलेल्या पुलावरून खाली नदीत पडल्याने हा अपघात झाला. बागो नदी ओलांडणाऱ्या पुलावर हा अपघात 27 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 5 वाजता झाला.  ( Telangana Accident: सिध्दीपेट जिल्ह्यात अनियंत्रित कारचा अपघात, चार जखमी; घटनेचा Video आला समोर)

चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं होतं, हे अपघातामागील कारण होतं. माळी येथे वारंवार रस्ते अपघात होत असतात. देशातील अनेक रस्ते, महामार्ग आणि वाहनांची दुरवस्था झाली आहे. आफ्रिकन देश मालीमध्ये वारंवार अपघात होत असल्याचं समोर येत आहे.

आफ्रिकन देश मालीमध्ये या अगोदर देखील भीषण अपघात झाला होता. या घटनेत १५ जणांनी त्यांचा जीव गमावल्याचं वृत्त आहे. वाहनांच्या भरधाव वेगामुळे अलीकडे रस्ते अपघाताच्या घटना वाढल्या आहेत. माली येथे राजधानी बामाकोच्या दिशेने जाणारी बस एका ट्रकला धडकली होती. तेव्हा या अपघातात 15 लोक ठार आणि 46 जखमी झाले होती.