Hawaii wildfires: हवाईमध्ये जंगलाला वणवा, सहा जणांचा मृत्यू
Wildfire | Representational image (Photo Credits: pxhere)

Wildfires in Hawaii: हवाई येथील जंगलाला आग लागून त्याचे रुपांतर वणव्यात झाले आहे. ज्यामुळे परिसरातील वनसंपत्ती, जैविकसंपत्ती जळून खाक झाली आहे. आतापर्यंत या आगीने सहा जणांचे प्राण गेल्याचे वृत्त आहे. वृत्तसंस्था एएनआयने माउई काउंटीचे महापौर रिचर्ड बिसेन ज्युनियर (Maui County Mayor Richard Bissen Jr) यांच्या हवाल्याने सीएनएनने दिलेल्या वृत्ताच्या संदर्भाने दिलेल्या वत्तात ही माहिती देण्यात आली आहे. महापौरांनी सांगितले की, मदत आणि बचाव कार्यासह शोधमोहीमही सुरु आहे. दरम्यान, मृतांची संख्या आणखी वाढू शकते.

रिचर्ड बिसेन ज्युनियर यांनी माहिती देताना सांगितले की, आगीमध्ये सहा जणांचा मृत्यू झाला आहे तर तीन जण गंभीर भाजले आहेत. यात एका अग्निशमन दलाच्या जवानाचाही समावेश आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. काहींना नाकातोंडात धूर गेल्याने श्वासोच्छवासास त्रास होतो आहे. आगीमुळे मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे. अनेक गोष्टी जळून खाक झाल्या आहेत. (हेही वाचा, Portugal Wildfire: पोर्तुगालमध्ये जंगलात आग, 1,400 लोकांचे स्थलांतर)

रिचर्ड बिसेन ज्युनियर यांनी माहिती देताना सांगितले की, आगीमध्ये सहा जणांचा मृत्यू झाला आहे तर तीन जण गंभीर भाजले आहेत. यात एका अग्निशमन दलाच्या जवानाचाही समावेश आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. काहींना नाकातोंडात धूर गेल्याने श्वासोच्छवासास त्रास होतो आहे. आगीमुळे मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे. अनेक गोष्टी जळून खाक झाल्या आहेत.

अग्निशमन दल आणि प्रशासनाने आग नियंत्रणासोबतच प्रामुख्याने 'जीव वाचवने आणि जतन' करण्यावर अधिक भर दिला जातो आहे. किंबहुना त्याच गोष्टीला प्राधान्य दिले जात आहे. वनसंपत्ती वाचविण्याचे प्रचंड मोठे आव्हान सध्या सरकारसमोर आहे. आग आटोक्यात आणण्याासठी अग्निशमन विभाग 24 तासांच्या शिफ्टमध्ये काम करत असल्याचे रिचर्ड बिसेन ज्युनियर यांनी सांगितले.

व्हिडिओ

दरम्यान, आगीमुळे अनेक ठिकाणी वीजप्रवाह खंडीत झाला आहे. त्यामुळे हवाईयन इलेक्ट्रिकचे अधिकारी लोकांना धीर देत लवकरच वीजप्रवाह पुनर्संचयित केला जााईल. काम सुरु असल्याचे सांगत आहेत. पश्चिम माउईमध्ये अंदाजे 12,400 ग्राहक सध्या वीजेशिवाय राहात आहेत. विविध भागात अनेक खाली पडलेले खांब आणि वीजवाहिन्या दुरुस्त करण्याचे काम कर्मचारी करत आहेत.